शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खून, बलात्काराचे प्रलंबित गुन्हे चार दिवसात निकाली काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सर्व ठाणेदार व एसडीपीओंची बैठक घेतली. त्यात सर्व प्रकारच्या प्रलंबित गुन्ह्यांचा लेखाजोखा ठेवला गेला. चक्क चार ते पाच वर्षांपासून गुन्हे प्रलंबित असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे एसपी भुजबळ जाम संतापले. तपासाच्या या पद्धती व संथगती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा प्रकार पुन्हा दिसल्यास थेट कारवाईला तयार राहा असा थेट इशारा एसपींनी दिला.

ठळक मुद्देएसपींचा ‘अल्टीमेटम’ : जबाबदारी एसडीपीओंवर, आढावा बैठकीत संताप

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात खून, बलात्कार, वाटमारी, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले, अकस्मात संशयास्पद मृत्यू असे शंभरावर गुन्हे प्रलंबित आहे. यातील काही गुन्हे एक ते पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून निकाली निघालेले नाही. जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासाच्या या संथगतीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. प्रलंबित गुन्हे निकाली काढण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चार दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला असून गुन्हे मार्गी लावण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. डॉ. भुजबळ यांनी जिल्ह्यातील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी सर्व ठाणेदार व एसडीपीओंची बैठक घेतली. त्यात सर्व प्रकारच्या प्रलंबित गुन्ह्यांचा लेखाजोखा ठेवला गेला. चक्क चार ते पाच वर्षांपासून गुन्हे प्रलंबित असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे एसपी भुजबळ जाम संतापले. तपासाच्या या पद्धती व संथगती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा प्रकार पुन्हा दिसल्यास थेट कारवाईला तयार राहा असा थेट इशारा एसपींनी दिला. यवतमाळ शहर, अवधूतवाडी, पुसद ग्रामीण, पुसद शहर, उमरखेड, महागाव अशा काही पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे आढळून आले. अकस्मात संशयास्पद मृत्यूची ३० ते ४० प्रकरणे प्रलंबित आहे. त्यानंतरही तपास अधिकारी, ठाणेदार, एसडीपीओ यांनी दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. एवढ्या मोठ्या संख्येने गुन्हे प्रलंबित असताना संबंधित तपास अधिकारी बिनधास्त रजेवर जाऊ शकतात कसे असा सवाल एसपींनी उपस्थित केला. काही गुन्हे दाखल झाले असताना मासिक अहवालात नमूद केले गेले नाही, प्रलंबित गुन्ह्यांचा आकडा कमी  दिसावा म्हणून अहवालातून गुन्हे दडपले गेल्याचा संशय व्यक्त केला गेला. एकूणच प्रलंबित गुन्ह्यांचा वाढलेला डोंगर खणून काढण्याची जबाबदारी एसपी भुजबळ यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे गुन्हे प्रलंबित आहे, त्यांना एसडीपीओ कार्यालयात आणून बसवा, तेथेच त्यांच्याकडून पुढील चार दिवसात हे गुन्हे निकाली काढा असे निर्देश एसडीपीओंना देण्यात आले. उमरखेड, पुसद, दारव्हा, यवतमाळ विभागाच्या तुलनेत पांढरकवडा व वणी विभागात प्रलंबित गुन्ह्यांची संख्या नगण्य असल्याचे सांगितले जाते.  

पोलिसांवर निलंबन कारवाईची टांगती तलवार अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत नकोच अशी स्पष्ट भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी जिल्ह्यात रुजू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून घेतली आहे. त्यानंतरही काही ठिकाणी धंदे सुरू आहेत. तर कुठे संबंधित बीट जमादार व पोलिसांचे दुर्लक्ष, अप्रत्यक्ष संरक्षण त्याला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा पोलिसांना निलंबित करण्याचा सपाटा एसपींनी सुरू केला आहे. अनेक वर्ष गुन्हे प्रलंबित ठेवणाऱ्या काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरसुद्धा निलंबन कारवाईची टांगती तलवार आहे. पुढील आठवड्यात त्यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे. एका एपीआयकडे तब्बल २५ गुन्हे प्रलंबित असल्याचे आढळून आले. याशिवाय काही जमादारांकडे अकस्मात मृत्यूची प्रकरणे अशीच मोठ्या संख्येने प्रलंबित दिसून आली. त्यांच्यावर एसपींच्या कारवाईचा हातोडा पडणार असल्याचेही सांगितले जाते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस