शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुका टँकरमुक्तीचा आराखडा

By admin | Updated: December 4, 2014 23:16 IST

तालुक्यात पाणीटंचाई ही वर्षभरही कायम असते. उन्हाळ्यात तर अतिशय भीषण परिस्थिती असते. त्यामुळे तालुक्यात कुठे ना कुठे टँकर सुरूच असतो. आता मात्र पुसद तालुक्याला टँकरमुक्त करण्यावर जिल्हा

पुसद : तालुक्यात पाणीटंचाई ही वर्षभरही कायम असते. उन्हाळ्यात तर अतिशय भीषण परिस्थिती असते. त्यामुळे तालुक्यात कुठे ना कुठे टँकर सुरूच असतो. आता मात्र पुसद तालुक्याला टँकरमुक्त करण्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी जोर दिला आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहे.
पंचायत समिती पुसद येथे पाणीपुरवठा विभाग आणि सिंचन विभागाचा आढावा नुकताच जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुफाटे यांनी घेतला. यावेळी संबंधित विभागांचे पदाधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक आदींची उपस्थिती होती. यावेळी तालुक्यातील ज्या गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई निर्माण होवू शकते अशा गावांमध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या जावू शकतात या बाबत चर्चा करण्यात येवून टंचाईग्रस्त गावांचा कृती आराखड्यात समावेश करण्यात आला. विहीर खोलीकरण, विहीर अधिग्रहण, विहिरीतील गाळ काढणे, नवीन हातपंप घेणे आदी उपाययोजना राबवून तालुक्याला शक्य तितक्यालवकर टँकरमुक्त करण्यावर जिल्हा परिषद अध्यक्षांनी जोर दिला.
सिंचन विभागाच्या आढावा सभेत तीन सिंचन तलाव घेण्याचे ठरले. यामध्ये पन्हाळा, नानद पाझर तलाव व सावरगाव बंगला आदींचा समावेश आहे. सावरगाव बंगला येथील पाझर तलाव प्रस्तावित करण्यात आला. विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत १५ तलावांची कामे हाती घेण्यात आली. सिंचन विभागामार्फत पुसद विभागात आठ सिंचन तलाव, ३९ पाझर तलाव, तीन साठवण तलाव, दहा कोल्हापुरी बंधारे, दहा गाव तलाव, दोन माळगुजारी तलाव मंजूर झाले असल्याची माहिती सिंचन विभागामार्फत देण्यात आली आहे.
त्याचबरोबर १५०० सहस्त्र घनमीटर पाणी उपलब्ध असल्यास तलावांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, अशी अट असून त्यासाठीचे प्रमाणपत्र हे नाशिक येथून प्राप्त करून घ्यावे लागते. या किचकट अटीमुळे पुसद तालुक्यातील बऱ्याच ठिकाणचे प्रकल्प रखडले असल्यामुळे ही अट शासनाकडून रद्द करण्यात यावी, यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ.फुफाटे यांनी सभेत सांगितले. पुसद तालुक्यातील अनेक गावांना वर्षभर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. माळपठारावरील परिस्थिती तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय भीषण असते. त्यामुळे या नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
या सभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, पंचायत समिती पुसदचे सभापती सुभाष कांबळे, उपसभापती अवधूत मस्के, जिल्हा परिषद सदस्य एस.व्ही. वद्देवार तसेच बी.एच. भुजाडे आणि पाणीपुरवठा व सिंचन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)