शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जवळा परिसरात रेती माफियांचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

रेती माफियांवर कुणाचाच वचक नाही. आर्णी तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने त्याने माया जमवली. प्रति ब्रास सात हजार रुपये दराने रेती विकून माफिया गब्बर होत आहे. जवळा परिसरात अडाण नदीवरून मोठ्या प्रमाणात रेती आणली जात आहे. दररोज १0 ते १२ ट्रक्टरवदारे खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. काही रेती माफियांनी शेकडो ब्रास रेतीची साठवणूक करून ठेवली आहे.

ठळक मुद्देप्रशासन मूग गिळून : शेतकरी दहशतीत, परिसरात रेतीचे अनेक साठे

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा : आर्णी तालुक्यातील जवळा परिसरात रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे. रेती माफिया शिरजोर झाले असून तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकऱ्यांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे.रेती माफियांवर कुणाचाच वचक नाही. आर्णी तहसील प्रशासनाच्या आशीर्वादाने त्याने माया जमवली. प्रति ब्रास सात हजार रुपये दराने रेती विकून माफिया गब्बर होत आहे. जवळा परिसरात अडाण नदीवरून मोठ्या प्रमाणात रेती आणली जात आहे. दररोज १0 ते १२ ट्रक्टरवदारे खुलेआम रेतीचा उपसा सुरू आहे. काही रेती माफियांनी शेकडो ब्रास रेतीची साठवणूक करून ठेवली आहे. साठविलेली रेती ब्राम्हणवडा, ब्राम्हणवडा तांडा, शेकलगाव, जवळा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात दिसून येते. तेथूनच रात्री अंधारात ट्रकने दारव्हा, यवतमाळ येथेही रेतीची वाहतूक केली जाते.अवैध रेती वाहतुकीने शेत शिवराचे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. याची माहिती संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांनाही आहे. मात्र तरीही रेती माफियांवर कारवाई होत नाही. त्यामुळे रेती माफिया माझे कोणीच काही करू शकत नाही, असे ठासून सांगत आहे. यामुळे नदी काठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य माणसाचा तहसील कार्यालयावरील विश्वास उडालेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेकडो ब्रास साठवलेल्या रेतीचा पंचनामा करून रेती माफियावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.विविध योजनांच्या घरकुलांचे काम रखडलेपरिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विविध योजनेतील घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. प्रति ब्रास सात हजार रुपयांप्रमाणे लाभार्थी रेती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे माफियांनी साठविलेल्या रेतीचा पंचनामा करून ती रेती घरकूल लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ज्ञानदीप चोपडे यांनी व्यक्त केली. घरकूल लाभार्थी सुनिता गजानन पवार यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजूर झाले. मात्र बांधकामाला लागणाऱ्या रेतीचा दर प्रचंड असल्याने त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, याची त्यांना काळजी लागली आहे. अधिकाºयांनी रेती तस्करीकडे लक्ष देऊन गरिबांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी आशा त्यांनी वयक्त केली.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया