सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 05:00 AM2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:22+5:30

सदाशिवराव ठाकरे (९७) यांचे मंगळवारी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली होती. इंझाळाचे ते मूळचे रहिवासी होते. बुधवारी सकाळी ११.५० वाजता त्यांचे पार्थिव यवतमाळ येथून इंझाळा येथे आणण्यात आले. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.

Sadashivrao Thackeray merged into infinity | सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन

सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन

Next
ठळक मुद्देइंझाळा येथे अंत्यसंस्कार : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतले अंतिम दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : भूदान चळवळीचे प्रणेते तथा माजी खासदार दिवंगत सदाशिवराव ठाकरे (काका) यांच्या पार्थिवावर बुधवारी इंझाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सदाशिवराव ठाकरे (९७) यांचे मंगळवारी यवतमाळच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदी पदे भूषविली होती. इंझाळाचे ते मूळचे रहिवासी होते. बुधवारी सकाळी ११.५० वाजता त्यांचे पार्थिव यवतमाळ येथून इंझाळा येथे आणण्यात आले. यावेळी माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. पंचायत समितीचे माजी उपसभापती रामकृष्ण पाटील राऊत, आर्णीचे माजी सभापती विजय पाटील राऊत, पांढरकवडा बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश मानकर, किशोर दावडा, शंकरराव ठाकरे, अभिषेक ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, बल्लू पाटील लोणकर आदींसह विविध पक्षीय नेते आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
तहसीलदार पूजा मोटोडे, ठाणेदार दिनेश शुक्ला यांनी प्रशासनाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रा. प्रदीप राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्य सभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे गुलामनबी आझाद, खासदार सुप्रिया सुळे, लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्या शोकसंदेशांचे वाचन केले. दिवंगत सदाशिवराव ठाकरे यांचे चिरंजीव जितेंद्र यांनी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मुखाग्नी दिला. त्यानंतर सदाशिवराव ठाकरे पंचतत्त्वात विलीन झाले. उपस्थितांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत अंत्यदर्शन घेतले.

गुलाम नबी आझाद यांची श्रद्धांजली
सदाशिवराव सर्वांसाठीच आदरणीय होते

गांधीवादी व ज्येष्ठ सर्वोदयी नेते तथा काँगे्रस पक्षाचे माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच खूप दु:ख झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, आमदार, खासदार म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे सदाशिवराव सर्वांचे काका होते. सर्वांसाठी ते आदरणीय होते. एक आदर्श मार्गदर्शक म्हणून त्यांनी पक्षामध्ये आपली जागा निर्माण केली होती. आज हा मार्गदर्शक आम्हाला सोडून गेला, ही उणीव कधीही भरून निघणार नाही.
- गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्ष नेता, राज्यसभा

Web Title: Sadashivrao Thackeray merged into infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.