धामणगाव बायपासवरील पेट्रोलपंपावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:19+5:30

उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार जण पेट्रोलपंपावर आले.

A robbery at a petrol pump on Dhamangaon Bypass | धामणगाव बायपासवरील पेट्रोलपंपावर दरोडा

धामणगाव बायपासवरील पेट्रोलपंपावर दरोडा

Next
ठळक मुद्देपहाटे ३ वाजताची घटना : चौकीदाराला पकडून केली तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील धामणगाव-नागपूर या बायपासवर असलेल्या पेट्रोलपंपावर पहाटे ३ वाजता चार जणांनी दरोडा घातला. दरोडेखोरांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. त्यामुळे त्यांनी चौकीदाराला पकडून पेट्रोलपंपाची तोडफोड केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नुकसानीचा गुन्हा दाखल आहे.
उदय धरमसिंह रा.यवतमाळ यांच्या मालकीचे हे पेट्रोलपंप आहे. रात्रीपर्यंत जमा झालेली रोख रक्कम दररोज घरी अथवा बँकेत जमा केली जाते. त्यामुळे पेट्रोलपंपावर रात्रीदरम्यान रोख रक्कम राहात नाही. असे असले तरी सोमवारी पहाटे ३ वाजता चेहरा झाकलेल्या अवस्थेत चार जण पेट्रोलपंपावर आले. त्यांनी चौकीदाराला ताब्यात घेऊन बाजूला बसवले. नंतर पेट्रोलपंपावरील कॅबीनच्या काचा फोडून आत प्रवेश केला. ड्रॉव्हर, लॉकर, पेचकच व लोखंडी सळाखीने फोडले. इतकेच नव्हेतर आॅईलच्या गोदामाचे दार तोडून रोख रक्कम मिळते का पाहिले. हा संपूर्ण घटनाक्रम पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चारही चोरटे जवळपास अर्धातास धुमाकूळ घालत होते. हाती काही न लागल्याने अखेर ते निघून गेले. विशेष म्हणजे पहाटे २.३० वाजताच्या सुमारास पोलिसांची पेट्रोलिंग वाहन पेट्रोलपंपासमोरून निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासाने हे दरोडेखोर पेट्रोलपंपावर आले होते. त्यांच्याजवळ लोखंडी सळाखी, पेचकच, दोरी असे साहित्य होते. ही घटना कायद्याच्या चौकटीत दरोड्याच्या गुन्ह्यात बसणारी नसली तरी तिची तीव्रता दरोड्याइतकीच आहे. चौकीदाराला धमकावत तोडफोड झाली. जवळपास ५० हजारांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शहर ठाण्यात नुकसानाची गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या घटनेची तीव्रता कमी झाली आहे. निर्ढावलेल्या हल्लेखोरांचा शोध घेणे आवश्यक आहे. राजरोसपणे वर्दळीच्या मार्गावरचे पेट्रोलपंप फोडण्यास हे आरोपी मागेपुढे पाहात नाही. भविष्यात त्यांच्याकडून मोठी घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांकडून विशेष कोणत्याच हालचाली झाल्या नाही.

Web Title: A robbery at a petrol pump on Dhamangaon Bypass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर