शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव-रानवड रस्ता ठरतो जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

या रस्त्याने पायदळ जाणे म्हणजे जीवघेणे ठरते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. राळेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाढोणाबाजार येथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे.

ठळक मुद्देपांदण रस्त्यापेक्षाही दयनीय : वाढोणाबाजारचा एकमेव मार्ग, विद्यार्थ्यांपुढेही अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणाबाजार : पांदण रस्त्यालाही लाजवेल असा रानवड-पिंपळगाव रस्ता आहे. दुचाकी, चारचाकी वाहने तर दूर बैलगाडीही या मार्गाने काढणे मोठे कठीण काम झाले आहे. या रस्त्याने पायदळ जाणे म्हणजे जीवघेणे ठरते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. राळेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाढोणाबाजार येथे जाणारा हा एकमेव रस्ता आहे.सन २००८-०९ मध्ये या रस्त्याचे मातीकाम करण्यात आले. पुढे कुणीही या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष दिले नाही. गेली दहा वर्षांपासून या भागातील लोकांना अतिशय दयनीय अवस्थेत असलेल्या या रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. पावसाळ्यात जीवघेणी सर्कस करावी लागते. पिंपळगाव, रानवड, वाठोडा या गावातील विद्यार्थ्यांना वाढोणाबाजार येथे शिक्षणासाठी याच रस्त्यावरून मार्ग काढावा लागतो. पाऊस सुरू असल्यास त्यांची शाळाही पडते.परिसराच्या चारही गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हाच रस्ता असल्यामुळे त्यांची फजिती होते. वाढोणाबाजार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी उपचारासाठी रुग्णाला आणायचे झाल्यास सोबतचेही आजारी पडल्यास नवल वाटू नये. पिंपळगाव येथील नाल्यावर पूल नाही. पूर आल्यास हा रस्ता बंद पडतो. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आदींकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी लक्ष दिले नाही. या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पिंपळगाव, रानवड, वाठोडा गावातील सरपंच व नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक