शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने अडविला शेतकऱ्यांचा रस्ता

By admin | Updated: March 10, 2017 01:16 IST

इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे.

इंग्रजकालीन गेट बंद : शेती करणे झाले कठीण, रस्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणीवणी : इंग्रज राजवटीपासून असलेले वडगाव रस्त्यावरील गेट बंद करून शेकडो शेतकऱ्यांचाव मार्गच रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली शेती करणे कष्टप्राय बनले आहे. रेल्वे प्रशासनाने बंद केलेले गेट पूर्ववत सुरू करून शेतकऱ्यांना त्रासमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.नागपूर-वणी-राजूर (कॉलरी) हा रेल्वेमार्ग इंग्रज राजवटीत सुरू झाला. कोळसा व चुना या खनिजांची वाहतूक या मार्गाने केली जात होती. या रेल्वे मार्गावर वरोरा रस्ता, नांदेपेरा रस्ता व वडगाव रस्ता या ठिकाणी मानवरहित रेल्वेगेट होते. वडगाव रस्त्यावर किमी ८५६/३-४ याठिकाणी गेट क्रमांक ७ सी. होते. वणी शहरातील शेकडो शेतकऱ्यांची शेती वडगाव व रांगणा शिवारात आहे. हे सर्व शेतकरी वडगाव रस्त्यानेच रहदारी करून शेती करीत होते. त्यानंतर वणी-आदिलाबाद हा रेल्वे मार्ग बनविण्यात आला. या रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्या सुरू झाल्या. रेल्वे प्रशासनाने मानवरहित रेल्वे गेटची संख्या कमी करण्याचे धोरण अवलंबले. यामध्ये वडगाव रस्त्यावरील गेट क्रमांक ७ सी. बंद करण्यात आले. शहरातील जनतेसाठी पर्यायी रस्ता म्हणून नांदेपेरा गेटजवळ मिळणारा उपरस्ता तयार करून दिला. मात्र हा रस्ता जनतेसाठी सात किलोमीटरचा फेरा देणारा आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांना हा रस्ता अडचणीचा ठरत आहे. शेतकऱ्यांना जनावरे घेऊन जाणे कटकटीचे बनले आहे. शेतमजुरांना शेतात नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. जनावरे जुन्याच वडगाव रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जनावरांचे अपघात घडत आहे. वणी-यवतमाळ बायपास रस्त्यावर प्रचंड रहदारी असल्याने हा मार्ग धोक्याचा बनला आहे. म्हणूनच वडगाव रस्त्यावरील फाटक पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी करणारे निवेदन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, रेल्वेचे प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिले. यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती संगीता भंडारी, आरोग्य सभापती संतोष डंभारे, नगरसेवक राकेश बुग्गेवार, विवेक कोकणे, नरेंद्र भंडारी, सुधाकर मत्ते, आदी उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)