ग्रामीणमधील लाखो तेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहण्याचा धोका

By Admin | Updated: May 30, 2015 02:34 IST2015-05-30T02:34:26+5:302015-05-30T02:34:26+5:30

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे यावर्षी राज्यातील ग्रामीण भागातील लाखो वेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहणार ...

The risk of being deprived of lakhs of leprosy laborers in rural areas | ग्रामीणमधील लाखो तेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहण्याचा धोका

ग्रामीणमधील लाखो तेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहण्याचा धोका

यवतमाळ : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे यावर्षी राज्यातील ग्रामीण भागातील लाखो वेंदूपत्ता मजूर बोनसपासून वंचित राहणार असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.
यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविंदा मध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित आदिवासी खेडयातील तेंदुपत्ता तोडाई ग्रामसभेला दिली होती. या सर्व २००० हजारांवर आदिवासी अनुसूचित खेडयांची तेंदुपत्ता तोडाई राज्यपालांच्या आदेशावरून ग्रामसभा करणार होती. मात्र मुख्य कार्यपालन अधिकारी यांना ग्रामसेवक तोडाई करायला तयार नाही असे पत्र देऊन वनखात्याने ठेकेदारांमार्फत तोडाई करण्यास पुन्हा आमंत्रित केले व मागील १६ वर्षांपासून तेंदुपत्ता तोडाई व मालकीचा हक्क आदिवासींना मिळावा यासाठी लढा देणारे तेंदूपत्ता मजुर समितीच्या यशावर पाणी फेरले गेले. मात्र आता वन विभागाने जाहीर पत्रक वाटून यवतमाळ जिल्हयातील ३०० च्यावर पेसा खेड्यातील सुमारे ३ लाख आदिवासींना यावर्षी तेंदूपत्ता बोनस देण्यात येणार नाही असे जाहीर केले असुन आदिवासींनी हा तेंदूपत्ता बोनससाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी बोला असे सरळ उत्तर तेंदूपत्ता मजूर समितीला दिले आहे. यामुळे यवतमाळ जिल्हयातील आदिवासी तेंदूपत्ता मजूर बोनस पासून वंचित राहणार तरी सरकारने वनखात्याला आदेश देऊन आदिवासींना तेंदूपत्ता बोनस विषय आदिवासींमधून देण्याची मागणी तेंदूपत्ता मजुर समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे .
यावर्षी यवतमाळ जिल्हयातील ३४० गावात ग्रामसभेमार्फत तेंदूपत्ता तोडाई व विक्रीचा प्रस्ताव ग्रामीण मंत्रालयाला दिला होता. त्यामध्ये केळापूर तहसीलमधील मोहदरी, जोगीण कवला, मीरा, जीरा, घोडदरा, सखी बुद्रुक, वाढोणा खुर्द, करंजी, वाढोणा, द्रुक, तिवसाला (वनगाव), कोठोडा, सुरदेवी, चनई, असोली, मोह्दा, कारेगाव, चिखलदरा, कृष्णापूर, धाबा, मोरवा , खैरगाव, वाघोली, कुसळ, चोपण, मलकापूर (वन गाव), केगाव, वडनेर, झुली, भाड उमरी, पहापल , नागेझरी खुर्द, बहात्तर, सुसरी, पेंढरी पिप्पलि, डोंगरगाव, दोन्ही, मालेगाव खुर्द, दर्यापूर हिवरी पिम्पल शेंडा, कारेगाव, वळवाट, खैरी, घुबडी, गनेरि, भीमकुंड, ठाणेगाव, कोन्घारा, साखरा बुद्रुक, धारणा, मंगी, ढोकी, वाई, मप्लापूर, गणेशपूर, खैरगाव, निलजाई, मारेगाव, अंभोरासह अनेक गावांचा समावेश असल्याचे
विजसचे संयोजक व मजूर समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The risk of being deprived of lakhs of leprosy laborers in rural areas