शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेडवर रिपाइं(ए)चा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. युतीत सहभागी रिपाईने उमरखेडची मागणी केली. रिपाइंजवळ तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे आता भाजपने चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा, असा नवा फार्मुला दिल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : युतीत विचारमंथन, जागा सोडण्यावर खल

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आहे. युतीत सहभागी रिपाईने उमरखेडची मागणी केली. रिपाइंजवळ तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे आता भाजपने चिन्ह आमचे, उमेदवार तुमचा, असा नवा फार्मुला दिल्याचे सांगितले जात आहे.युतीमध्ये उमरखेडची जागा रिपाइंने (आठवले गट) मागितली आहे. मात्र भाजपने रिपाइंच्या उमेदवाराने आपल्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अट घातली आहे. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवायची की नाही, याबाबत विचारमंथन सुरू आहे. रिपाइंने मात्र अद्याप होकार दिला नाही. रिपाइंने होकार दिल्यास चिन्ह भाजपचे अन् उमेदवार रिपाइंचा, असा आगळावेळा उमेदवार येथे राहण्याचे संकेत आहे.रिपाइंने ज्या इच्छुकाला उमेदवारी देऊ केली, त्या उमेदवाराने नुकताच मतदारसंघाचा फेरफटका मारला. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे मत जाणून घेतले. विद्यमानांवर नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी रिपाइंच्या इच्छुकाला सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे.रिपाइंचे कार्यकर्ते काय म्हणतात, याचीही चाचपणी पक्ष स्तरावरून सुरू आहे. कोणत्याही स्थितीत रिपाइंनेच लढावे, असे अनेकांना वाटत आहे. पक्ष चिन्हाचे काय घेऊन बसलात, त्यापेक्षा आपली माणसं वाढवा, असा संदेशही रिपाइंकडून इच्छुकाला देण्यात आला आहे. चिन्ह कोणते आहे हे महत्त्वाचे नसून आपली माणसे विधानसभेत गेली पाहिजे, हा विचारही अनेकांनी इच्छुकाला बोलून दाखविला आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही मत घेतले जाणूनयुतीत सहभागी रिपाइं उमरखेड विधानसभा मतदारसंघाकरिता उत्सुक आहे. विदर्भातील चारपैकी उमरखेडवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. संभाव्य इच्छुकाचा बायोडाटा भाजप प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात चिन्ह आमचे, माणूस तुमचा, अशी स्थिती राहण्याचे संकेत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक