शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सहा नगरपंचायतींचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: August 21, 2015 02:53 IST

नव्यानेच नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या महागाव, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब, झरीजामणी या सहा ठिकाणचे प्रभागनिहाय आरक्षण गुरुवारी काढण्यात आले.

कही खुशी कही गम : आता नजरा नगराध्यक्षपदाकडे, ५० टक्के आरक्षणातून ७२ महिलांना संधीयवतमाळ : नव्यानेच नगरपंचायतीचा दर्जा मिळालेल्या महागाव, बाभूळगाव, मारेगाव, राळेगाव, कळंब, झरीजामणी या सहा ठिकाणचे प्रभागनिहाय आरक्षण गुरुवारी काढण्यात आले. ग्रामपंचायती असताना गावाचे नेतृत्व करणाऱ्या अनेकांचा या आरक्षण सोडतीनंतर भ्रमनिरास झाला. तर अनेक नव्या इच्छूकांसाठी मात्र राजकारणाचा मार्ग खुला झाला. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायत झाल्याने सदस्यसंख्या वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मात्र अपेक्षा उंचावल्या आहेत. आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.राळेगावात महिलांची सरशीराळेगाव नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवारी पंचायत समिती सभागृहात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली १७ प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निघालेले आरक्षण काहींकरिता खुशीचे तर अनेकांसाठी निराशेचे ठरले आहे. १७ पैकी ९ ठिकाणी महिलांसाठी आरक्षण निघाले आहे.त्यातही अनुसूचित जातीकरिता दोन तर अनुसूचित जमातीकरिता तीन जागा राखीव असल्याने ना.मा.प्र. आणि खुल्या जागेवर पुरुषांकरिता फक्त मोजक्या सहा जागांची संधी उरली आहे.सर्वप्रथम अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता प्रभाग आरक्षित करण्यात आले. त्यानंतर लहान मुलीच्या हस्ते विविध प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता चिठ्या काढून प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे, मुख्याधिकारी व नायब तहसीलदार मधुकर गेडाम, मंडळ अधिकारी बी. एन. पोटे आदी हजर होते. शहरातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व निवडणुकीस इच्छूकांनी यावेळी सभागृहात गर्दी केली होती. राळेगावचे आरक्षण पुढीलप्रमाणे निघाले आहे.प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती, दोन अनुसूचित जमाती महिला, तीन अनुसूचित जमाती महिला, चार सामान्य, पाच अनुसूचित जाती महिला, सहा नामाप्र महिला, सात नामाप्र महिला, आठ सामान्य, नऊ नामाप्र, दहा सामान्य महिला, अकरा सामान्य, बारा अनुसूचित जाती, तेरा सामान्य, चौदा सामान्य महिला, पंधरा नामाप्र महिला, सेळा सामान्य महिला, सतरा नामाप्र असे आरक्षण जाहीर झाले आहे. आता नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.महागावात मातब्बरांची निराशामहागाव नगरपंचायतीच्या १७ वॉर्डाचे आरक्षण येथील तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता काढण्यात आले. उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण मानकर, तहसीलदार के. डी. वायकोस यांची प्रमुख उपस्थिती होती. महागावातील वॉर्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. वॉर्ड क्रमांक एक खुला, दोन खुला, तीन खुला, चार अनुसूचित जाती महिला, पाच खुला महिला, सहा खुला महिला, सात अनुसूचित जाती महिला, आठ नामाप्र महिला, नऊ खुला महिला, दहा नामाप्र महिला, अकरा अनुसूचित जाती, बारा नामाप्र महिला, तेरा खुला, चौदा अनुसूचित जमाती, पंधरा नामाप्र, सोळा नामाप्र, सतरा सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणापूर्वी नगरसेवक बनण्याची इच्छा असलेल्या अनेक मातब्बरांचा आरक्षणामुळे हिरमोड झाला आहे. वॉर्ड आरक्षणामुळे आता उमेदवार निवडप्रक्रियेला वेग आला आहे.कळंबमध्ये ९ जागा महिलांनाकळंब नगरपंचायत सभागृहात ईश्वरचिठ्ठीने आरक्षणाची सोडत काढण्यात आली. १७ नगरसेवकांपैकी ९ जागा महिलांसाठी विविध प्रवर्गात आरक्षित करण्यात आल्या आहेत. वार्डनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. वार्ड क्रमांक एकमध्ये ओबीसी महिला, दोन सर्वसाधारण, तीन सर्वसाधारण महिला, चार सर्वसाधारण, पाच ओबीसी सर्वसाधारण, सहा अनुसूचित जाती, सात ओबीसी महिला, आठ अनुसूचित जमाती, नऊ सर्वसाधारण, दहा सर्वसाधारण महिला, अकरा अनुसूचित जाती महिला, बारा सर्वसाधारण , तेरा अनुसूचित जमाती महिला, चौदा ओबीसी महिला, पंधरा सर्वसाधारण महिला, सोळा सर्वसाधारण महिला, सतरा ओबीसी सर्वसाधारण अशाप्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले. आरक्षणाची सोडत उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार एस. एम. होटे, एम. एस. व्यवहारे, मंडळ अधिकारी आर. जी. शिंदे, तलाठी विजय मेश्राम यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. (लोकमत चमू)