शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाने ‘कही खुशी, कही गम’

By admin | Updated: October 6, 2016 00:19 IST

जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचन भवनात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली.

जिल्हा परिषद : अनेक दिग्गजांना शोधावा लागेल नवीन पर्याय यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचन भवनात आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या आरक्षणामुळे ‘कही खशी, कही गम’, अशी अवस्था झाली. पुसद तालुक्यात सर्वाधिक आठ जागा असून त्यापैकी केवळ एकच जागा खुल्या प्रवर्गासाठी असल्याने दिग्गजांना फटका बसला आहे.जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रथम अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांचे, नंतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणात पुसद तालुक्याला मोठा फटका बसला. आठपैकी केवळ एकच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहे. उर्वरित सहापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सामान्य महिलेसाठी प्रत्येकी एक जागा आरक्षित झाली. तीन जागा अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसाठी आहे. माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांना आता केवळ मोहा-भंडारी याच एका गटातून लढता येणार आहे.यवतमाळ तालुक्यातही मोठी उलथापालथ झाली. या तालुक्यात तीन जागा कमी झाल्या. आता चार जागांपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांना आता आसोला-तळेगाव आणि चिचघाट-येळाबारा या मतदार संघातून लढावे लागणार आहे. यात चिचघाट-येळाबारा गटात माजी सदस्य चंद्रकांत गाडे यांचे वर्चस्व आहे. मांगुळकर आणि गाडे यवतमाळ बाजार समितीच्या निवडणुकीत परस्पर विरोधात पॅनल लढवीत आहे. दारव्हा तालुक्यात पाचपैकी चार जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. त्यामुळे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे आणि बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांच्यासाठी बोरी-तळेगाव मतदार संघ शिल्लक आहे. कळंब तालुक्यातील तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या असून माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासाठी जोडमोहा-डोंगरखर्डाचा पर्याय आहे. राळेगाव तालुक्यातही तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने माजी अध्यक्ष अ‍ॅड.प्रफुल मानकर आणि माजी सदस्य चित्तरंजन कोल्हे यांना वरध-झाडगाव मतदार संघच उरला आहे. शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांच्या मारेगाव तालुक्यातील दोनपैकी एक जागा खुली, तर दुसरी जागा ओबीसीसाठी असल्याने त्यांचा मार्ग पुन्हा सुकर झाला आहे. वणी तालुक्यात चारपैकी केवळ घोन्सा-कायर मतदार संघ खुला आहे. (शहर प्रतिनिधी)