शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणासाठी संघटनांचे निवेदन

By admin | Updated: April 9, 2015 00:04 IST

आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यवतमाळ : आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन आणि कुरेशी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. सर्व समित्या आयोगाच्या अहवालात मुस्लीम समाजाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती अत्यंत कमकुवत दाखविली आहे. शिवाय शासनाकडे मुस्लीम समाजाला वेगवेगळ््या प्रमाणात आरक्षण जाहीर करण्याचे सुचविले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. तसेच मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळातर्फे मंजूर कर्जरोखे अजूनही गरजू आणि होतकरू मुस्लीम तरुणांपर्यंत पोहोचले नाही. जाचक अटी आणि शर्तीमुळे बहुतांश तरुणांना योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागले. ही बाबही निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आली आहे. मुस्लीम समाजाला सर्वच स्तरावर किमान १२ टक्के आरक्षण मंजूर करावे आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे जिल्हाध्यक्ष शेख नईम शेख रहीम, कुरेशी समाज बहुउद्देशीय संस्थेचे जिल्हाध्यक्ष हाजी महेबूब कुरेशी आदी उपस्थित होते. विदर्भ शेतकरी विकास परिषद, मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅन्ड जस्टीस, वेलफेअर पार्टी आॅफ इंडिया, नॅशनल लोकहिंदी पार्टी, जनजागरण बहुउद्देशिय संस्था, रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (खोब्रागडे गट), असोसिएशन आॅफ प्रोटेक्शन सिव्हील राईट युथ विंग, आयडियल रिलिफ विंग, भीमसेना, अल्पा ओमेगा ख्रिश्चन महासंघ, शेतकरी, कामागार संघर्ष परिषद, बळीसंदेश, ओबीसी फोरम, जोहर ग्रुप, जमियत उलेमा-ए-हिंद, विदर्भ रिपब्लीकन विचार मंच आदी संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य यावेळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)