शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नियम डावलून एकच काम दोन मजूर संस्थांना

By admin | Updated: July 27, 2014 23:58 IST

नियम धाब्यावर बसवून लाखोंचे एकच काम दोघांना अशी एकूण तीन कामे सहा मजूर संस्थांना दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर विद्युतीकरणाची कुशल कामेही

यवतमाळ : नियम धाब्यावर बसवून लाखोंचे एकच काम दोघांना अशी एकूण तीन कामे सहा मजूर संस्थांना दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर विद्युतीकरणाची कुशल कामेही मजूर संस्थांना देण्यात आल्याचेही पुढे आले आहे. राजकीय पुढारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी बेंबळा प्रकल्पातील अभियंत्यांनी हा प्रकार केला आहे. शासनाच्या धोरणानुसार एका मजूर संस्थेला वर्षभरात केवळ ५० लाख रूपयांपर्यंतची कामे देता येतात. त्यासाठी विभागीय स्तराहून परवानगी घेवून दायित्व आणि सांकेतांक क्रमांक मिळाल्यानंतरच ही कामे देता येतात. असे असताना बेंबळा आणि डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचे लाखो रूपयांचे एकच काम दोन मजूर संस्थाना देण्यात आले. त्यामध्ये बेंबळा प्रकल्प स्थळावरील सेवा पथाच्या डांबरीकरणाचे आठ लाख ९१ हजार रूपयांचे आणि धामणगाव महामार्ग ते बेंबळा प्रकल्प रस्त्याच्या डांबरीकरणाचे असे एकूण २३ लाख रूपयांचे काम स्व. वसंतराव नाईक मजूर कामगार सहकारी संस्था पिंपरी खुर्द यांना देण्यात आले होते. हेच काम मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादीत तालुका यवतमाळ या संस्थेला दिले गेले. एवढेच नाही तर या दोन्ही संस्थाना काम दर्जेदार आणि पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देवून देयकेही काढली गेली. मजूर संस्थांना केवळ अकुशल कामे देण्याचे प्रावधान असताना बाभुळगाव तालुक्यातील कोल्ही - १ येथील ४८ विस्तारीत भूखंडाच्या विद्युतीकरणाचे तीन लाख ४० हजार आणि कोल्ही -२ येथील स्मशानभूमिच्या विद्युतीकरणाचे एकच काम संत सखूमाउली मजूर सहकारी संस्था बऱ्हाणपूर व कान्होबा मजूर सहकारी संस्था मर्यादीत आष्टी या दोन संस्थाना देण्यात आली. एवढेच नाहीतर बेंबळा प्रकल्पाचे वक्रद्वार उघडून पाणी सोडण्यासाठी मजूर पुरवठ्याचे १० लाख ७३ हजार रूपये किमतीचे एकच काम स्व. वसंतराव नाईक मजूर कामगार सहकारी संस्था पिंपरी आणि अन्य एका संस्थेला देण्यात आले. विशेष असे की, दुसऱ्या संस्थेचे नावही अभियंत्यांनी शिताफिने रेकॉर्डच गायब केले. वास्तविक धरणाचे वक्रद्वार उघडण्यासाठी विजेची व्यवस्था उपलब्ध आहे. शिवाय ती व्यवस्था निकामी झाल्यास जनरेटरची व्यवस्था आहे. असे असताना बळजबरीने हे काम संबंधीत संस्थांना दिल्या गेले. त्यासाठी विभागीय स्तरावरील परवानगी, सांकेतीक क्रमांक आणि दायित्व या कुठल्याही बाबी ही कामे देताना घेण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)