शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मजूर सोसायट्या नियमांच्या कचाट्यात

By admin | Updated: July 27, 2014 23:57 IST

मजूर कामगार सहकारी सोसायटीच्या नावावर अनेकांनी आपली दुकानदारी थाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रत्यक्ष मजूर काम करते की, नाही याची पडताळणी करण्यासाठी उच्च

निकषांची प्रतिपूर्ती नाही : केवळ पाच सोसायट्यांचा अहवाल यवतमाळ : मजूर कामगार सहकारी सोसायटीच्या नावावर अनेकांनी आपली दुकानदारी थाटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. प्रत्यक्ष मजूर काम करते की, नाही याची पडताळणी करण्यासाठी उच्च न्यायालयाने निकष ठरवून दिले आहे. याच निकषाची प्रतिपूर्ती करण्यात आल्याचे प्रमाणपत्र सहकार उपनिबंधकानी मागितले आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांचे पितळ उघडे पडणार आहे. जिल्ह्यात एकूण १२९ मजूर कामगार सहकारी सोसायट्या कार्यरत आहे. चार निकषांची पूर्तता करणाऱ्याच संस्थेला काम देण्याचे स्पष्ट निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले आहे. वर्षाअखेर या निकषाची पडताळणी केली जाते. याबाबतचा तपासणी अहवाल तालुका सहायक निबंधकांकडूनच मागविण्यात आला आहे. प्रत्यक्षात तीन महिन्याचा कालावधी लोटूनही केवळ पाच मजूर कामगार सहकारी संस्थांनी निकष पूर्ण केल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागात सोसायट्यासाठी आरक्षित कामाचे अजूनही वाटप झाले नाही. केवळ जिल्हा परिषदेतच मजूर कामगार सोसायट्यांचे लांगुनचालन सुरू आहे. मजूर कामगार सोसायट्यामध्ये अफरातफर झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. शहरातील काम वाटपात गैरप्रकार झाल्याची तक्रार यवतमाळ नगरपरिषदेतील नगरसेवकांनी जिल्हा सह निबंधकाकडे केली होती. त्यावरूनच प्रत्येक मजूर कामगार सहकारी सोसायटीची पडताळणी करण्यात आली. ही बाब गंभीरपणे घेण्यात आली असून तालुकास्तरावरही कसून तपासणी केली जात आहे. मजूर कामगार सहकारी सोसायटीचेच मजूर प्रत्यक्ष कामावर राहतात की नाही, याची पडताळणी करण्यासाठी हे निकष ठरविण्यात आले आहे. मजूर कामगार सहकारी सोसायटीतील जो सभासद प्रत्यक्ष काम करत नाही, त्यांना काढून टाकण्यात यावे, मजूर सभासदांना ओळखपत्र देण्यात यावे, सर्व सभासंदाची बँक खाती उघडून त्यांना धनादेशाद्वारेच मजुरी द्यावी, याचा अहवाल संबंधित बँकांकडून दर आठवड्याला तालुका सहायक निबंधकाने मागवावा, सर्व सभासदाचा अपघात विमा काढलेला असावा तसेच मजूर सहकारी सोसायटीला २० आक्टोबर १९८६ च्या आदेशापूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व सवलती चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)