शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’च्या महसुलात घट

By admin | Updated: January 11, 2017 00:28 IST

नोटाबंदी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूलात तब्बल दहा कोटींची घट झाली

नोटाबंदीचा फटका : सरासरी ६० टक्के कर वसुली
यवतमाळ : नोटाबंदी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या महसूलात तब्बल दहा कोटींची घट झाली असून ६० कोटी ७६ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या तिजोरीत परिवहन विभागाच्या माध्यमातून मोठा आर्थिक भरणा जमा होतो. शासनाच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापैकी परिवहन खाते महत्वाचा स्त्रोत आहे. जिल्ह्यात लहान मोठ्या अशा साडेतीन लाखांवर वाहनांची नोंदणी आहे. त्यांच्याकडून विविध स्वरूपात कर गोळा केला जातो. ओव्हरलोड वाहने आणि वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून सर्वाधिक कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवणे अपेक्षित आहे. मात्र रिक्त जागांमुळे अशा वाहनधारकांचे फावत असून याचा फटका महसुली उत्पन्नावर होत आहे. परिवहन कार्यालयात वाहतूक निरीक्षकांच्या सहा जागा मंजूर असून प्रत्यक्ष तेच अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत. या प्रमाणे उपपरिवहन अधिकारी श्याम झोळ यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त जागेवर पुर्णवेळ अधिकारी देण्यात आला नाही. सहायक परिवहन अधिकारी विनोद देशमुख यांच्याकडे प्रभार आहे. त्यामुळे सध्या परिवहन कार्यालयात ‘आॅलईन वन’ म्हणून देशमुख काम करत आहेत.
पोलीस आणि परिवहन विभागाच्या कार्यवाहीत ४७५ वाहनांचा वाहतूक परवाना रद्द करण्यात आला आहे. तर ४९३ वाहनांची नोंदणी निलंबित केली. यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. काही वाहनातून अवैध वाहतूक केल्याचेही कारवाईत निष्पन्न झाले होते. अशाच वाहनाचे परवाने रद्द अथवा निलंबित करण्यात आले आहे. यात राज्याबाहेरची वाहने असल्यास तेथील परिवहन कार्यालयाकडे याचा अहवाल पाठविण्यात आला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

करदात्यांची संख्या घटली
नोव्हेंबर अखेरपर्यंत ४० कोटी ५० लाखांचा महसूल वसूल झाला. २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत महसूल वसुली करताना अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. नोटबंदीनंतर महसूल वसुलीचा ओघ वाढणे अपेक्षित होते, मात्र त्याचाही फायदा झाला नाही. उलट कर दात्यांची संख्या घटली आहे. नव्याने वाहन खरेदी होत असल्याने एकाच वेळी होणारा टॅक्स जमा होणे कमी झाले आहे.