शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

इंडसईड बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घातला साडेदहा लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी बँक व्यवस्थापक राजेश आस्वले यांनी दोघांविरोधात तक्रार दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील दारव्हा मार्गावर इंडसईड बँकेची शाखा आहे. या बँकेकडून वाहनांसाठी कर्ज दिले जाते. तेथील कलेक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या दोघांनी वसूल केलेला पैसा बँकेत जमाच केला नाही. जवळपास साडेदहा लाख रुपयांचा अपहार केला. हे प्रकरण माहीत झाल्यानंतर सावरासावर करण्यासाठी बँकेतीलच  सहकाऱ्याला मारहाण करून जबरदस्ती पावत्या बनवायला सांगितल्या. त्याने नकार देताच बँकेच्या कलेक्शन मशीनसह प्रिंटर घेऊन दोघेही पसार झाले. चेतन विठ्ठलराव ठाकरे (३२), अमोल राजू विलायतकर (३२) दोघेही रा.चमेडियानगर, यवतमाळ असे गुन्हा दाखल झालेल्या वसुली कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात  ग्राहकांच्या तक्रारी सातत्याने सुरू होत्या. या तक्रारींची चौकशी केली असता साडेदहा लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यामुळे १३ एप्रिल रोजी चेतन ठाकरे याने वसुली कर्मचारी आशीष बगमारे याला ग्राहकाचे पैसे घेऊन रिसिट बनवायची आहे. असे सांगत बसस्थानकावर बोलावले. त्या वेळी चेतनसोबत अमोल विलायतकर उपस्थित होता. आशीषने दोघांना पैशांची मागणी केली. नंतरच पावती तयार करतो, असे सांगितले. यावरून चिडलेल्या दोघांनी आशीषवर हल्ला केला. त्याला सर्जिकल ब्लेडचा धाक दाखवून त्याच्याजवळील बँकेची रोख पावती बनविण्याची मशीन, प्रिंटर व १८ हजार ६३० रुपये रोख असलेली बॅग हिसकावून नेली. याप्रकरणी बँक व्यवस्थापक राजेश आस्वले यांनी दोघांविरोधात तक्रार दिली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कलम ४०६, ४०८, ४२०, ३९४, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६ व ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला.

बँक व्यवस्थापकांनी दिली होती तोंडी समजदोन्ही आरोपी अनुक्रमे मागील पाच व तीन वर्षांपासून इंडसईड बँकेच्या दारव्हा रोड शाखेत कार्यरत आहे. शाखा अधिकारी आकाश तिवारी याला या दोघांच्या व्यवहारावर फेब्रुवारी महिन्यात संशय आला होता. त्यांनी ग्राहकांकडे वसूल केलेले एक लाख रुपये भरलेच नाही. हा प्रकार व्यवस्थापक राजेश आस्वले यांना सांगण्यात आला. त्या वेळी दोघांनाही बोलावून समज देण्यात आली. मात्र, त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नाही. अखेर ग्राहकांना साडेदहा लाखांचा गंडा घातल्याचे हे प्रकरण पुढे आले. त्यानंतर मात्र बँक प्रशासनाने थेट पोलिसात धाव घेतल्याने दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले. 

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी