शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्शाचा अर्थ ओळखून ‘ती’ भडकली वरिष्ठावर

By admin | Updated: September 29, 2014 00:52 IST

कोण कसा स्पर्श करतो याची सर्वाधिक जाणीव महिलांना असते. असाच एका वरिष्ठाच्या स्पर्शाचा अर्थ ओळखून एक महिला शिपाई चांगलीच भडकली. सर्वांच्या समक्ष अधिकाऱ्याचा पाणउतारा केला.

पोलीस ठाण्यातील गंभीर प्रकार : आधीच दोघी गळाला तरीही तिसरीचा नाद यवतमाळ : कोण कसा स्पर्श करतो याची सर्वाधिक जाणीव महिलांना असते. असाच एका वरिष्ठाच्या स्पर्शाचा अर्थ ओळखून एक महिला शिपाई चांगलीच भडकली. सर्वांच्या समक्ष अधिकाऱ्याचा पाणउतारा केला. आधीच दोघी गळाला लावणाऱ्या या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला तिसरीला नादाला लावण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला. परंतु खात्याची लक्तरे वेशीवर टांगली जाऊन नये म्हणून प्रकरण तेथेच मिटविले. मात्र व्हायचे तेच झाले, आणि त्याची गावभर चर्चा सुरू झाली. शासकीय कार्यालयात महिलांची होणारी कुचंबना टाळण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले. पोलिसात जाण्यापर्यंत त्यामध्ये प्रावधान आहे. महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षा मिळावी हा त्यामागे शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलिसांनाही अधिकार देण्यात आले आहे. मात्र ज्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली, त्यांच्याकडूनच असभ्य वर्तनाचे प्रकार घडत आहेत. यवतमाळातील एका ठाण्यात सध्या हा चर्चेचा विषय आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत दोन सहकारी महिलांना गळाला लावले. ही बाब सर्वश्रुत असताना तसेच त्या दोन सहकारी आणि पोलीस अधिकाऱ्याच्या वागण्यावर सर्वांचेच बारकाईने लक्ष असते. तरीही कुणाला काही ठाऊकच नाही या अर्विभावात त्यांची सलगी सुरूच असते. त्यामुळे तो पोलीस अधिकारी चांगलाच निर्ढावला आहे. त्यातूनच त्याने अलीकडेच एका कर्तव्यावरील महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पाठीवर हात ठेवला. हा स्पर्श शाबासकीचा निश्चित नाही हे तिच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. दुसऱ्या क्षणीच तिने त्या पोलीस अधिकाऱ्याचा हात झिडकारून शिव्यांची लाखोळी वाहिली. किमान वयाचे तर भान ठेवावे असा सल्लाही देण्यास ती विसरली नाही. हा सगळा प्रकार पाहून संपूर्ण ठाणेच गोंधळून गेले होते. दोन गळाला असताना तिसरीचा नाद कशाला असा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडून उपस्थित होत होता. तेवढ्यात एका ज्येष्ठ कर्मचाऱ्याने समजूत काढल्याने हा प्रकार निवळला. मात्र याची चर्चा जिल्हा पोलीस दलात कर्णोपकर्णी आहे. गस्ती दरम्यान वाहनातील प्रकार पाहून सहकारी, अधिकारी आणि कर्मचारी अक्षरश: डोळे मिटून घेतात. असाही अनुभव काहींनी सांगितला. (स्थानिक प्रतिनिधी)