शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात कवटीमुळे फुटली आत्महत्येला वाचा; पोलिसांच्या श्वानाने काढला माग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:43 IST

Yawatmal News suicide बियाणे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी यवतमाळात उघडकीस आली.

ठळक मुद्देबियाणे कंपनीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्यायवतमाळात कुजलेला मृतदेह आढळला  

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ: बियाणे कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी यवतमाळात उघडकीस आली. सुनील घनबहादूर रा. वरुड जऊळका ता. आकोट  जि. अकोला असे मृताचे नाव आहे. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. ही आत्महत्येची घटना रहस्यमयरीत्या उघडकीस आली. 

यवतमाळातील पळसवाडी कॅम्प स्थित जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकाला पाचारण केले असता या श्वानाने दारव्हा रोडवरील विशाल लॉजच्या मागील बाजूपर्यंत माग काढला. तेव्हा या घटनेचा उलगडा झाला. सुनील घनबहादूर याने लॉजच्या मागील बाजूला झाडाला कापडाने गळफास लावून आत्महत्या केली. परंतु त्याच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले. मृतेदह कुजलेला होता, गळफास घेतलेल्या अवस्थेत अंगातील कपडेच होते, शरीराचा बहुतांश भाग कुजून खाली पडला होता. यावरून ही आत्महत्या अनेक दिवस आधी झाली असावी असा अंदाज पोलीस वर्तवित आहे. सुनीलची पत्नी अकोला  जिल्हा पोलीस दलात लिपिक पदावर कार्यरत आहे. सुनील बियाणे कंपनीत असून तो नेहमीच विशाल लॉजमध्ये राहायचा. त्याला दारूचे व्यसन जडले होते. त्याची बॅग, वाहन लॉजमध्येच होते. मात्र त्याचा पत्ता नव्हता म्हणून लॉज मालकाने सुनीलच्या पुतण्याला याची माहिती दिली. त्यावरून पुतण्याने यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून ६ नोव्हेंबरपासून सुनील बेपत्ता असल्याचे फिर्याद नोंदविली. त्याचा शोध सुरू असतानाच बुधवारी अखेर त्याच्या आत्महत्येचा उलगडा झाला.

आत्महत्येच्या ठिकाणापासून श्वानांनी ही कवटी बऱ्याच दूर तोंडात धरुन आणली असावी, असा अंदाज आहे. या कवटीमुळेच सुनीलच्या आत्महत्येला वाचा फुटली. आत्महत्येमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पाेलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धारणे, यवतमाळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शहर ठाणेदार धनंजय सायरे व पथकाने घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्या