शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

उंदरांनी केली दोन लाखांची दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

लॉकडाऊन काळात बीअरबार, वाईन शॉप, बीअर शॉपी, गोदाम येथून छुप्या मार्गाने दारू काढून ती शौकिनांना तिप्पट-चौपट दराने विकली गेल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यात दारू साठ्यात तफावत आढळली. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत १९ परवाने कायमस्वरूपी निलंबित केले. तर आणखी दहा प्रकरणे त्यांच्या पुढे आहेत.

ठळक मुद्देवाईन शॉपमध्ये धुडगूस : बॉटल कुरतडल्याने वाहले दारूचे पाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिन्यांपासून दारू दुकाने बंद आहे. जणू याचाच फायदा उठवित एका वाईन शॉपमध्ये उदरांंनी प्रचंड धुडगूस घातला. दारूच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स कुरतडल्याने त्यातील दारूचे अक्षरश: पाट वाहले. गेल्या दोन महिन्यात उंदरांनी दीड ते दोन लाख रुपये किंमतीची दारू सांडवून नष्ट केल्याचे सांगितले जाते.लॉकडाऊन काळात बीअरबार, वाईन शॉप, बीअर शॉपी, गोदाम येथून छुप्या मार्गाने दारू काढून ती शौकिनांना तिप्पट-चौपट दराने विकली गेल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी तपासणी केली. त्यात दारू साठ्यात तफावत आढळली. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत १९ परवाने कायमस्वरूपी निलंबित केले. तर आणखी दहा प्रकरणे त्यांच्या पुढे आहेत. याशिवाय आणखी सहा देशी दारू व वाईन शॉपची प्रकरणे कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली जाणार आहे. एका बारमालकाने आर्णी रोडवरील कॅम्पमध्ये राहणाºया ‘विशाल’च्या माध्यमातून १३ लाख रुपयांची दारू विकली.लॉकडाऊन काळात चोरट्या मार्गाने दारू काढून जादा भावात विक्री करणाºया बीअरबार, शॉप-शॉपीवर कारवाईची प्रतीक्षा असतानाच यवतमाळात उंदरांनी वाईन शॉपमध्ये धुडगूस घातल्याचे एक मजेदार प्रकरण पुढे आले आहे. शहराच्या हृदयस्थळापासून नजीकच्या असलेल्या एका वाईन शॉपमध्ये हा प्रकार घडला. लॉकडाऊन असल्याने गेली कित्येक दिवस हे शॉप उघडले गेले नाही. या काळात या शॉप व गोदामातील दारू उंदरांनी नष्ट केली. दारूचे बॉक्स कुरतडून व त्यातील प्लॅस्टिकच्या बॉटल्स कुरतडून दारू जमिनीवर सांडविण्यात आली. त्यात अनेक महागड्या दारू बॉटल्सचाही समावेश आहे. दीड ते दोन लाख रुपये किंमतीची दारू उंदरांनी नष्ट केली. कदाचित या दारूवर पाणी समजून उंदरांनीही ताव मारला असण्याची शक्यता आहे. अलिकडेच वाईन शॉप उघडले असता उंदरांनी दारू नष्ट केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराची लिकर लॉबीत चर्चा आहे.लिकर लॉबीत शंकेचा सूरउंदरांनी दोन लाखांची दारू नष्ट केली, हे सांगण्यामागे काही खेळी तर नाही ना, दारू विकली तर गेली नाही ना, उंदरांनी नष्ट केलेल्या प्रमाणापेक्षा अधिकपट ती दाखविली गेली नाही ना, अशा अनेक शंका लिकर लॉबीतूनच व्यक्त केल्या जात आहे. तर प्रत्यक्षदर्शी उंदरांनीच दारू नष्ट केल्याचे सांगत आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा