शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

रेतीमाफियाचा तलाठ्यावर हल्ला

By admin | Updated: November 29, 2014 23:28 IST

तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीमाफिया निर्ढावले असून कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे.

उमरखेड : तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीमाफिया निर्ढावले असून कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे. बोरी(चातारी) परिसरात रेतीमाफियांनी कारवाईसाठी आलेल्या तलाठ्यावर गुरुवारी सायंकाळी हल्ला करून त्याला धमकाविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल केले.
मराठवाड्यातील रेतीमाफिया तालुक्याच्या हद्दीत येवून पैनगंगा नदीपात्रात सातत्याने रेतीचा उपसा करत आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी तहसीलदार शेजाळ यांनी एक पथक गठित केले. मंडळ अधिकारी पंडित आणि तलाठी सुरोशे, सानप, कानेडे यांचा त्यात समावेश केला. नदीच्या पात्रातून होत असलेल्या तस्करीची गोपनीय माहिती या पथकाने काढली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हे पथक चातारी शिवारात नदीपात्राकडे निघाले. रस्त्यात रेतीमाफिया देवीदास साहेबराव सूर्यवंशी रा.खडकी, ता.हिमायतनगर हा आपल्या ट्रॅक्टरजवळ बसून होता. त्याला तलाठी कानेडे यांनी विचारणा केली असता माझा ट्रॅक्टर बंद पडला आहे. याची राखण करण्यासाठी येथे बसून असल्याचे सांगत जवळ आलेल्या तलाठ्यावर तो धावून गेला. त्याने कॉलर पकडून कानेडे यांच्याशी झटापट केली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कानेडेही गांगारून गेले. मात्र पथकातील इतर कर्मचारी लगेच घटनास्थळावर धावून आल्याने आरोपींनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याचा ट्रॅक्टर क्र. एम.एच.२९/व्ही-१४ हाही ताब्यात घेण्यात आला. या आरोपीला महसूल पथकाने उमरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर ३५३, ३२३, ५०४, ५०६ अशा विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास एएसआय महादेव नोळे करत आहे. (प्रतिनिधी)