रासा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मुदत असलेली औषधे जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:15+5:30

औषध जाळण्याच्या प्रकाराची चौकशी केली जात असून यात दोषी असणाऱ्यांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रासा आरोग्य उपकेंद्रातील औषधी जाळण्यात आल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. औषधी जाळल्यानंतर त्यातून निघणाºया कडवट धुरामुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे पोतराजे यांचे म्हणणे आहे.

Rasa burned expired medicines at primary health sub-station | रासा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मुदत असलेली औषधे जाळली

रासा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मुदत असलेली औषधे जाळली

Next
ठळक मुद्देसरपंचांची तक्रार । वणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : औषधांची मुत संपली नसतानाही तालुक्यातील रासा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुमारे दोन पोते औषधे जाळण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी रासाच्या सरपंच मिरा पोतराजे यांनी वणी पंचायत समितीच्या सभापतींकडे तक्रार केली असून कार्यवाहीची मागणी केली आहे.
दरम्यान, पोतराजे यांनी यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्याकडेही तोंडी तक्रार केली. त्यानंतर आता औषध जाळण्याच्या प्रकाराची चौकशी केली जात असून यात दोषी असणाऱ्यांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास रासा आरोग्य उपकेंद्रातील औषधी जाळण्यात आल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. औषधी जाळल्यानंतर त्यातून निघणाºया कडवट धुरामुळे हा प्रकार उघडकीस आल्याचे पोतराजे यांचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर गावकरी व सरपंच मिरा पोतराजे यांनी रासा उपकेंद्रात कार्यरत परिचारीका रोहिनी खामनकर यांना विचारणा केली असता, खामनकर यांनी आम्हाला मुदतबाह्य असलेली औषधे पाठविण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे तीन गावांची जबाबदारी असल्याने औषधे वाटू शकली नाही, असाही युक्तीवाद खामनकर यांनी केल्याचे मिरा पोतराजे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पोतराजे यांनी तक्रारीतून केली आहे. जाळण्यात आलेल्या औषधांपैकी काही औषधांची डिसेंबर महिन्यात मुदत संपणार होती, असेही पोतराजे यांचे म्हणणे आहे. तसे पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा पोतराजे यांनी केला आहे.

रासा आरोग्य उपकेंद्रात औषधे जाळण्यात आल्याची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने चौकशी केली जात आहे. सोमवारी १८ नोव्हेंबरला मी स्वत: रासा आरोग्य उपकेंद्रात जाऊन या प्रकाराची चौकशी करणार आहे. दोषींवर कारवाई केली जाईल.
- डॉ.विकास कांबळे,
तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी

एक्सपायरी झालेली औषधे जाळताना त्यात एखादे एक्सपायरी न झालेले औषध जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सर्व जबाबदारी माझी असली तरी ज्यावेळी औषधी जाळली, त्यावेळी मी शासकीय कामाने बाहेर होते. मी स्वत: तपासणी करीत आहे.
- रोहिनी खामनकर, परिचारीका

Web Title: Rasa burned expired medicines at primary health sub-station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर