पावसाने केले जगण्याचे वांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:09+5:30

पिंपरी मुखत्यारपूर गावातील पंडित गजभिये यांनी तीन एकर पऱ्हाटी लावली. परतीच्या पावसाने धरलेली बोंड जमिनदोस्त झाली. कपाशीला काड्या तेवढ्या उरल्या. बँकेचे २८ हजार आणि इतर ३० हजार कर्ज फेडण्याची चिंता पंडितला लागण्यासोबतच जगण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. उज्ज्वला सूर्यवंशी आणि पंडित गजभिये यांच्यासारखीच अवस्था तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची आहे.

Rain promises to survive | पावसाने केले जगण्याचे वांदे

पावसाने केले जगण्याचे वांदे

ठळक मुद्देनैराश्याचे सावट : नेर तालुक्याच्या पिंपरी मुखत्यारपूर, घारेफळ गावातील नुकसानीचे वास्तव

किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : परतीच्या पावसाने थैमान घालून कपाशी व सोयाबीन उद्ध्वस्त केले. मंगळवारी प्रस्तुत प्रतिनिधी थेट पिंपरी मुखत्यारपूर व घारेफळ गावातील शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी ज्या वेदना स्पष्ट झाल्या त्यात उज्ज्वलाबार्इंचे दु:ख, तर पंडितचे जगण्याचे वांदे समोर आले.
कपाशीवर लाल्या येतो म्हणून घारेफळ येथील उज्ज्वला सहदेव सूर्यवंशी यांनी दहा एकरात सोयाबीन लावले. सोयाबीन काढणीला आल्यावर मजूर भेटत नव्हते. भाऊबीजेच्या दिवशी जोरदार पाऊस झाला. सोयाबीनच्या शेंगा खाली पडल्या. पावसात सडून गेल्या. आज हे शेतकरी कुटुंब काळ्या पडलेल्या शेंगा तोडत हाती लागेल ते मिळविण्याचा प्रयत्न करीत होतं. कर्जाची परतफेड आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
पिंपरी मुखत्यारपूर गावातील पंडित गजभिये यांनी तीन एकर पऱ्हाटी लावली. परतीच्या पावसाने धरलेली बोंड जमिनदोस्त झाली. कपाशीला काड्या तेवढ्या उरल्या. बँकेचे २८ हजार आणि इतर ३० हजार कर्ज फेडण्याची चिंता पंडितला लागण्यासोबतच जगण्याचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. उज्ज्वला सूर्यवंशी आणि पंडित गजभिये यांच्यासारखीच अवस्था तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची आहे. पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा अजूनपर्यंत तरी नुकसानग्रस्त काही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेली नाही.

Web Title: Rain promises to survive

टॅग्स :agricultureशेती