शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी समितीच्या अहवालावरून राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST

अहवाल सादर करण्यास विलंब का झाला यावरून सभेत माजी उपाध्यक्षांनी पदाधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले. काही ठिकाणी इन्सिलेटर मशीनच पोहोचल्या नाहीत. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना त्याची माहितीही नव्हती. तरीही कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. यावर सीईओंनी अहवालाचे वाचन करून येत्या १५ दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत गुरुवारी इन्सिलेटर खरेदीच्या घोटाळ्यावरून राडा झाला. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या अहवालावर अद्याप कारवाई न झाल्याबद्दल विरोधकांनी ऑनलाइन राडा केला. २०१९ मध्ये केंद्र राज्य शासनाच्या निधीतून सॅनिटर नॅपकिन आणि इन्सिलेटर मशीनची खरेदी करण्यात आली. ठिकठिकाणी या मशीन पाठविण्यात आल्या. त्यात मोठा घोटाळा झाल्याचा माजी उपाध्यक्षांनी आरोप केला होता. त्यावरून चौकशी समिती गठित करण्यात आली होती. समितीने ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात सीलबंद पाकिटातील हा अहवाल २ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. अहवाल सादर करण्यास विलंब का झाला यावरून सभेत माजी उपाध्यक्षांनी पदाधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले. काही ठिकाणी इन्सिलेटर मशीनच पोहोचल्या नाहीत. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना त्याची माहितीही नव्हती. तरीही कारवाई करण्यास चालढकल केली जात असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. यावर सीईओंनी अहवालाचे वाचन करून येत्या १५ दिवसांत निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र, अहवाल उशिरा का दिला याबाबत अध्यक्षांनीही प्रशासनाला धारेवर धरले. मंगला पावडे  आणि गजानन बेजंकीवार  यांनी शासनाच्या कोट्यवधींच्या निधीचा योग्य विनियोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.  सभेला अध्यक्ष कालिंदाताई पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, बालकल्याण सभापती जया पोटे, स्वाती येंडे, सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह सदस्य, विभागप्रमुख ऑनलाइन उपस्थित होते. वर्गखोल्या बांधकाम, दुरुस्तीवरून हंगामा - वर्गखोल्यांचे बांधकाम आणि दुरुस्तीवरूनही चांगलाच हंगामा झाला. विरोधकांनी यू-डायसमध्ये नसलेल्या शाळांमध्ये वर्गखोलीचे बांधकाम व दुरुस्ती केल्याचा आरोप केला. यावेळी सभापती श्रीधर मोहोड व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. प्रभारावरूनही घमासान- यवतमाळ बीडीओंच्या प्रभारावरूनही सभेत घमासान झाले. यवतमाळ पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी गोठा मंजुरीसाठी दहा हजार, तर विहिरीसाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. नरेगाच्या प्रभारी अधिकाऱ्यांवरूनही वाद पेटला. यावर सीईओंनी बीडीओंच्या अनेक जागा रिक्त असून पाचच बीडीओ कार्यरत असल्याचे सांगितले. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद