शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यांना गावकरीच करणार गावात क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच ...

ठळक मुद्देसमित्या गठित : तलाठी, ग्रामसेवकांना रोज मुख्यालयी राहण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यासाठी गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या असून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना दररोज मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सोमवारी याबाबत यंत्रणेला निर्देश दिले. त्यानुसार, गावातील तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांनी ३१ मार्चपर्यंत गावात हजर राहणे आवश्यक केले आहे.गावात बाहेरगावातून किंवा बाहेर देशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली आहे. सरपंच या समितीचे अध्यक्ष असून उपरोक्त कर्मचाºयांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा यात समावेश आहे. यासह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्यही या समितीत असतील. तर पोलीस पाटील हे समितीचे सचिव आहेत. गावकºयांचेही सहकार्य यासाठी लाभणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीतील सूचनेनुसार या समित्या गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गावकºयांत जनजागृती होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल.- कुणाल झाल्टे,तहसीलदार, यवतमाळआकपुरी गावात तात्काळ अमलबजावणीतहसीलदारांचे निर्देश येताच आकपुरीवासीयांनी ग्रामपंचायतीत बैठक घेऊन समिती गठित केली आणि कामही सुरू केले. गावात काही दिवसांपूर्वी आलेल्या नागरिकांना घरीच थांबण्याचे निर्देश दिले. या बैठकीला सरपंच बाळू कासार, उपसरपंच गजानन राऊत, ग्रामसेवक आर. पी. साव, तलाठी अरविंद गुरनुले, कृषी सहायक पूनम देवकते आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या