शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्याची आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबई, पुणे आदी महानगरासह परप्रांतात अडकून पडलेले नागरिकांचे लोंढे पुसद शहर व तालुक्यात परत येत आहे. तालुक्यातील एका गावातील मूळचा रहिवासी असलेला एक ४५ वर्षीय इसम मुंबई येथे गेल्या १५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक (सीक्युरिटी गार्ड) म्हणून आपल्या कुटुंबियांसह काम करतो. १४ मे रोजी तो पत्नी, मुलगा व कुटुंबियासह मेटॅडोअरने पुसदला पोहोचला. नंतर आपल्या गावी गेला.

ठळक मुद्देएक संशयित मुंबई येथून परतला : ताप, खोकल्यावर उपचार सुरू, तूर्तास एकही कोरोनाबाधीत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : मुंबई येथून परतलेल्या एकाला शनिवारी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले. ताप व खोकल्याची लक्षणे असलेल्या इसमावर सध्या उपचार सुरु असून सदर इसमाची मुंबई प्रवासाची ‘हिस्ट्री’ असल्याने तालुक्याची आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ झाली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबई, पुणे आदी महानगरासह परप्रांतात अडकून पडलेले नागरिकांचे लोंढे पुसद शहर व तालुक्यात परत येत आहे. तालुक्यातील एका गावातील मूळचा रहिवासी असलेला एक ४५ वर्षीय इसम मुंबई येथे गेल्या १५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक (सीक्युरिटी गार्ड) म्हणून आपल्या कुटुंबियांसह काम करतो. १४ मे रोजी तो पत्नी, मुलगा व कुटुंबियासह मेटॅडोअरने पुसदला पोहोचला. नंतर आपल्या गावी गेला. १५ मे रोजी सायंकाळी तो येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे यांनी त्याची आरोग्य तपासणी करुन आयसोलेशन वॉर्डात भरती केले. सदर इसमास रक्तदाब व मधुमेह आदी आजार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. या संशयित रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहे. सोबत त्याची पत्नी असल्याची माहिती डॉ. फुपाटे यांनी दिली.१०८ रुग्णवाहिका हजर ठेवाकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावर कोव्हीड केअर सेंटर आणि डीसीएचसीमधील कोव्हीड रुग्णांकरिता १०८ रुग्णवाहिका एमएच १४ सीएल ११४५ ही गाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातच हजर ठेवा, असे लेखी आदेश उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णवाहिकेवर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिले आहे.कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याकरिता शासन व प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहेत. त्यादृष्टीने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्यात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह आढळला नसल्याचा दावा प्रशासन व आरोग्य यंत्रणा करीत असली, तरी सध्याच्या काळात मुंबई व पुणे येथून मजुरांचे लोंढेच्या लोंढे शहर व तालुक्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून आता १०८ रुग्णवाहिकेवर कर्तव्य बजावणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना हे वाहन उपजिल्हा रुगणालयातच उपस्थित ठेवण्यात यावे, असे आदेशीत करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या आदेशाचा हवाला देण्यात आला.आमदारांनी आरोग्य यंत्रणेला केले अवगतसदर संशयिताला कोरोनासारखी ताप व खोकल्याची लक्षणे असल्याने आयसोलेशन वॉर्डात भरती केले. चौथ्या दिवशी त्यांचा ‘स्वॅब’ घेतला जाईल. सध्या त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली. यासंदर्भात आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करुन आरोग्य यंत्रणेला अवगत केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल