शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

५२७ सेवा सोसायट्या विलिनीकरणाचा प्रस्ताव

By admin | Updated: March 11, 2017 00:54 IST

शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून या ...

जिल्हा बँक : सहकार प्रशासनाची मात्र सर्वच बँकांना आॅफर यवतमाळ : शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून या सर्व सोसायट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव बँकेच्या अध्यक्षांनी आधीच दिला आहे. परंतु सहकार प्रशासनाने बँकेच्या या प्रस्तावाचा विचार न करता अन्य बँकांनाही या विलिनीकरणासाठी आॅफर दिल्याने सहकार क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते. जिल्ह्यात अशा सेवा सहकारी संस्थांची संख्या ५२७ एवढी आहे. या संस्थांचे नियंत्रण जिल्हा देखरेख सहकारी संघामार्फत चालते. बैद्यनाथन समितीने या संस्थांना नवसंजीवनी दिली. त्यांनाच आपले गटसचिव नेमण्याचे अधिकार दिले. आजच्या घडीला या सेवा सोसायट्यांकडे सुमारे १०० गटसचिव व कर्मचारी आहेत. त्यांच्यामार्फतच शेतकऱ्यांना कर्ज वाटप होते. परंतु या सोसायट्यांवर अर्थात गट सचिवांवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थेट नियंत्रण नाही. या सोसायट्या बँकेच्या अधिपत्याखाली येत नाहीत. पर्यायाने गटसचिव जिल्हा बँकेला जुमानत नाहीत. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपावर व वसुलीवर होत असल्याचे आढळून आले. विलिनीकरणाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुण्याच्या सहकार आयुक्तांकडेही पाठविला गेला. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची जिल्हा बँकेला प्रतीक्षा असतानाच सहकार प्रशासनाने मात्र याबाबत वेगळीच वाट निवडली आहे. सहकार खात्याने जिल्हा बँकच नव्हे तर सर्वच बँकांना सोसायट्यांचे कर्मचारी विलीन करण्याबाबत खुली आॅफर दिल्याने जिल्हा बँकेच्या संचालक मंडळामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ५० कोटींच्या या संपत्तीची मालकी देखरेख संघाची असली तरी त्याच्या खरेदीसाठी लागलेला पैसा मात्र सेवा सोसायट्यांचाच असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) शंभर गटसचिव होणार बँक कर्मचारी म्हणूनच जिल्ह्यातील सर्व सेवा सोसायट्यांचे कर्मचारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विलीन करण्याचा प्रस्ताव बँकेतर्फे देखरेख संघ व सोसायट्यांपुढे ठेवण्यात आला होता. तसे झाल्यास सोसायट्यांच्या गटसचिव व कर्मचाऱ्यांना बँकेचे सेवा प्रवेश नियम लागू होतील. हे कर्मचारी पूर्णत: बँकेच्या नियंत्रणात येतील. त्यांना कारवाईची भीती राहील, असा या प्रस्तावामागील उद्देश होता. ५० कोटींची स्थावर मालमत्ता हस्तांतरणास विरोध सोसायट्यांनी आपल्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह कर्मचाऱ्यांना जिल्हा बँकेत विलीन करावे, असा हा प्रस्ताव होता. तर काही गटसचिवांचा सेवा सोसायट्यांच्या ५० कोटींच्या संपत्तीसह विलीन होण्यास विरोध आहे. सोसायट्यांनी संयुक्त निधीतून ही संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे बँकेला संपत्ती हस्तांतरित करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे काही गटसचिवांचे म्हणणे आहे.