शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी मंचच्या ‘सुवर्ण स्पर्श’चे बक्षीस वितरण

By admin | Updated: May 26, 2016 00:10 IST

लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘सुवर्ण स्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका - २०१५’ च्या प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण

यवतमाळ : लोकमत सखी मंचतर्फे आयोजित ‘सुवर्ण स्पर्श राज्यस्तरीय बक्षीस धमाका - २०१५’ च्या प्रोत्साहनपर बक्षिसाचे वितरण ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय, गांधी चौक यवतमाळ येथे सुरू झाले आहे. प्रेरणा संदीप शेंडेकर, ममता इसासरे, प्रतिभा शिंदे, प्रीती प्रदीप ठाकरे, मंजुषा विजय कोल्हे, रेखा उमेश वाजपेयी (सर्व यवतमाळ), बबिता टाके, जयश्री वाकोडे (पांढरकवडा) या स्पर्धक प्रोत्साहनपर बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत. लोकमत जिल्हा कार्यालयातून दुपारी १२ ते ६ या वेळात बक्षीस प्राप्त करून घेता येईल. सोबत सखी मंचच्या ओळखपत्राची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक आहे. सखी मंचच्या यवतमाळ येथील सदस्यांसाठी ओढणी साडी, मेन रोड यवतमाळव्दारा भाग्यवंत सोडत काढण्यात आली आहे. यात रोहिणी ढोले (तिरुपती नगर, यवतमाळ) या भाग्यवंत ठरल्या आहेत. त्यांना ओढणी साडीव्दारे एक हजार रुपये किमतीची साडी मिळणार आहे. यासाठीचे कुपन लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालयातून प्राप्त करून घेता येईल. तसेच भवानी गोल्ड कव्हरिंग, सिल्व्हर कव्हरिंग ज्वेलरीव्दारा सखी मंच सदस्यांसाठी खास सोडत जाहीर केली होती. यात चारुशीला दीपक कोरटकर या सदस्या मानकरी ठरल्या. यासाठीचे कुपन लोकमत जिल्हा कार्यालयातून प्राप्त करून घेता येईल. विजेत्या स्पर्धकांनी आपले पुरस्कार येत्या तीन दिवसात प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (वार्ताहर)