शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्राथमिक शाळाही 17 ऑगस्टपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोना रुग्ण कमी होत असल्याचे पाहून राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १७ ऑगस्टपासून पहिली ते सातव्या वर्गाच्या शाळाही सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील प्राथमिक शाळाही सुरू होणार आहे. मात्र अद्याप राज्य शासनाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा असल्याचे शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले. जिल्ह्यात १५ जुलैपासून शहरी क्षेत्र वगळता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरू करण्याची तयारी केली जात आहे. मात्र शहरी क्षेत्रातील शाळांबाबत अद्यापही शिक्षण विभागातून ठोस निर्णय होताना दिसत नाही. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आहे. 

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

शाळा सुरू झाली तर मी माझ्या मुलीला शाळेत पाठवायला तयार आहे. तसे संमतीपत्रही यापूर्वीच शाळेला दिले आहे. माझी मुलगी जिल्हा परिषद शाळेत आठव्या वर्गात आहे. तिलाही प्रत्यक्ष शाळेत जाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. शाळा सुरू व्हावी.     - साधना उरकुडे, पालक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलाच्या आरोग्याची चिंता वाटतेच. पण आता कोरोना आपल्या जिल्ह्यात येऊन एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. मग आणखी किती दिवस शिक्षण बंद ठेवायचे. मोबाईलवरच्या ऑनलाईन शिक्षणात मुलांना तेवढा रस नाही. प्राथमिक शाळा सुरू झाल्याच पाहिजे.    - नीलेश डहाके, पालक

 

टॅग्स :Schoolशाळा