शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

केळापूर जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची तयारी

By admin | Updated: September 30, 2016 03:03 IST

केळापूर येथील प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा विविध

विविध कार्यक्रम : एसटी महामंडळाकडून विशेष बसची व्यवस्था, १ आॅक्टोंबरपासून प्रारंभनरेश मानकर पांढरकवडाकेळापूर येथील प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा विविध धार्मिक व प्रबोधनात्मककार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़१ आक्टोंबर रोजी संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांच्या पांढरकवडा येथील निवासस्थानावरुन श्री जगदंबा मातेच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे़ ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत केळापूर येथील जगदंबा मंदीरात पोहचेल़ घटस्थापना झाल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येईल़ २ आक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता मान्यवरांचे उपस्थितीत भजन स्पर्धेला सुरुवात होईल व ३ आक्टोंबर रोजी भजन स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण होईल. ४ आक्टोंबर रोजी हास्य सम्राट वऱ्हाडी कवी डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांचा विनोदी कार्यक्रम ‘मिर्झा एक्सप्रेस’ चे आयोजन करण्यात आले आहे. ५ आक्टोंबर रोजी राष्ट्रीय किर्तनकार आचार्य बाळू महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम, ६ आक्टोंबरला किशोर पेंटर यांचा पंचरंगी कॉमेडी शो व ७ आक्टोंबर रोजी ‘स्वर गुरुकुंजाचे’ हा अमोल बांबल प्रस्तुत राष्ट्रीय भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात गुरुकुंज मोझरी येथील बाल कलावंत सहभागी होणार आहे. हे सर्व कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरु होईल़नवरात्रात दररोज सकाळची आरती ५ वाजून ५ मिनीटांनी तर संध्याकाळची आरती ७ वाजून ५ मिनीटांनी होईल. भाविकांसाठी एस.टी.महामंडळाने बसेचची व्यवस्था केली असून सकाळी ४.३० वाजतापासून केळापूरसाठी एस.टी.बस सोडण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारा नवरात्रोत्सव याही वर्षी विविध धार्मिकव प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा होत आहे. त्यासाठी व्यवस्थापन मंडळ तयारीला लागले आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान केळापूरची जगदंबा देवीकेळापूरच्या प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्र महोत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ होत आहे. नवरात्रात जगदंबामातेच्या दर्शनासाठी होणारी हजारो भाविकांची गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने संपुर्ण व्यवस्था केली आहे. धार्मिक ,पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या केळापूरला विशेष महत्व आहे़ नवरात्रात नऊही दिवस या ठिकाणी नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो़ जगदंबा मातेच्या दर्शनासाठी केवळ यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाडा व तेलंगणा या प्रदेशातील भाविक सुध्दा मोठ्या श्रध्देने केळापूरला जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात़ केळापूर या छोट्याशा खेड्यातील जगदंबा मातेचे हे पौराणिक मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे आराध्य दैवत मानले जाते़ जगदंबा मातेच्या दर्शनाने किंवा नामस्मरणाने अनेक संकटांचा नाश होऊन ईच्छीत कार्य व मनोकामना सिध्दीस जाते, अशी भक्तांची श्रध्दा आहे़