शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेती पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान : पिकांची धुळधाण, शेतात पाणीच पाणी, सोयाबीनला बुरशी, पºहाटी आडवी

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अरबी समुद्रातील कॅर चक्री वादळाने विदर्भात धुंवाधार पाऊस बरसत आहे. गत दोन दिवसात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस पिकांना असह्य झाल्याने शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुगीच्या तोंडावर झालेले हे नुकसान भरून निघणे अवघड आहे. यामुळे शेतकरी हादरले आहेत.हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.यवतमाळात १५ मिमी, बाभूळगाव १८, कळंब २१, दारव्हा २०, दिग्रस ११, आर्णी ४१, नेर २१, पुसद १९, उमरखेड २१, महागाव ३१, वणी २, मारेगाव ५, झरी ५, के ळापूर १, घाटंजी ४, तर राळेगावमध्ये ८ मिमी पाऊस कोसळला. आर्णी तालुुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. पाऊस न थांबल्याने सोयाबीनच्या गंज्या धोक्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटत आहेत. तर सोयाबीन वाळविता न आल्याने बुरशी पकडली आहे. कापसाचे बोंड गळून पडत आहे. पऱ्हाटी आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा त्राणच गेला आहे.आर्णी तालुक्यातील काही गावांची कृषी अधीक्षकांनी पाहणी केली. तर काही ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी भेटी दिल्या. केळापूर तालुक्यातील रूंझा परिसरातील १० ते १२ गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. शेकडो एकरवरील कपाशीचे नुकसान झाले. यातील रूंझा, रामपूर, जोगीनकवडा, दाभा, पाथरी, सायखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर, तहसीलदार सुरेश कवळे, उपविभागीय अधिकारी जगन राठोड, कृषी अधिकारी डी. बी. गडमवार, कृषी पर्यवेक्षक आर. आर. आत्राम, कृषी सहायक दातारकर, शुभम मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य गणेश आडे यांनी भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली.सुटीने खोळंबले सर्वेक्षणजिल्ह्यात अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे कर्मचारी शिवारात पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण खोळंबले आहे. त्यामुळे नुकसान आणखी वाढणार आहे.

अतिपाण्याने हरभरा जळण्याचा धोकाजिल्ह्यात सतत कोसळणाºया पावसाने रब्बी हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसाने पेरलेला हरभरा जळण्याचा धोका वाढला आहे.विमा कंपनीचा फोन लागेनापीकविमा उतरविणाºया शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर या शेतकºयांना २४ तासात मदत देण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले होते. सध्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीचे प्रतिनिधीच गवसले नाही. त्यांचा दूरध्वनी क्रमांक कायमच बंद येत होता. यामुळे शेतकºयांनी विमा कंपनीवर रोष व्यक्त केला.भाजीपाला पिकांचे मोठे नुकसानसतत कोसळणाऱ्या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, भेंडी, वांगे, कारले, वाल, दोडके या पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादन घटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती