शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘पीआरसी’ चमू जिल्हा परिषदेत

By admin | Updated: January 29, 2016 05:07 IST

जिल्हा परिषदेतील शासकीय निधीच्या नियमबाह्य खर्चावर गंभीर स्वरूपाचे १७८ आक्षेप लोकल फंडकडून नोंदविले गेले.

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील शासकीय निधीच्या नियमबाह्य खर्चावर गंभीर स्वरूपाचे १७८ आक्षेप लोकल फंडकडून नोंदविले गेले. या आक्षेपांची बुधवारी व गुरूवारी विधीमंडळाच्या पंचायत राज समिती शाखेच्या चमूने तपासणी केली. या माध्यमातून या आक्षेपांचे अनुपालन करण्याची अखेरची संधी जिल्हा परिषदेला दिली गेली आहे.
स्थानिक निधी लेखा संचालक कार्यालयाच्या पंचायत राज समिती शाखेचे मुंबई येथील सहायक संचालक संजय गोरे यांच्या नेतृत्वातील चमू बुधवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत दाखल झाली. या चमूमध्ये लेखाधिकारी मोरे, सहायक लेखाधिकारी पारे यांचा समावेश आहे. यवतमाळच्या स्थानिक निधी लेखा विभागाची टीमही त्यांच्या दिमतीला होती.
मुंबईच्या या चमूने लेखा आक्षेपांची तपासणी केली. जिल्हा परिषदेचे विविध १३ विभाग आणि १६ पंचायत समित्यांचे सन २०१३-१४ चे लेखा परीक्षण लोकल फंडमार्फत करण्यात आले. त्यात शासकीय निधीचा हिशेब न लागणे, नियमबाह्य खर्च, खर्चाची देयके सादर न होणे, चुकीच्या पद्धतीने खर्च होणे अशा स्वरूपाचे सुमारे १७८ गंभीर आक्षेप नोंदविले गेले. त्यात सर्वाधिक आक्षेप हे बांधकाम विभाग क्र. १ व क्र. २ चे असल्याचे सांगितले जाते. तेथेच शासकीय निधीच्या गोंधळाची सर्वाधिक प्रकरणे आढळून आली. या लेखा आक्षेपांमध्ये कोट्यवधी रूपयांच्या रकमा अडकून पडल्या आहेत. हे लेखा आक्षेप विधीमंडळाच्या पंचायत राज समितीला सादर होणाऱ्या अहवालात समाविष्ठ केले जाणार आहे. परंतु त्यापूर्वी या आक्षेपांचे अनुपालन करण्याची अखेरची संधी जिल्हा परिषदेला दिली जात आहे. त्यासाठीच ‘पीआरसी’ शाखेची ही चमू बुधवारी येथे आली होती. गुरुवारीही या चमूने आक्षेप अनुपालनाची कार्यवाही केली. लेखा परीक्षकाकडून नोंदविल्या गेलेल्या आक्षेपांचे काही रेकॉर्ड असेल तर उपलब्ध करून द्यावे म्हणून ही संधी दिली गेली होती.
मात्र १७८ पैकी सुमारे ५० आक्षेपांचे अनुपालन केले गेले. उर्वरित सुमारे सव्वाशे गंभीर लेखा आक्षेप विधीमंडळ पंचायत राज समितीच्या अहवालात आता समाविष्ठ केले जाणार आहे. अर्थात सदर आक्षेपांशी संबंधित सर्वांना यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत राज समितीच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)