शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘पीआरसी’ने घेतली अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील एकूण १५ सदस्यांची पंचायतराज समिती मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीईओंची साक्ष नोंदविली. त्यानंतर बुधवारी समितीने पाच वेगवेगळे गट करून विविध पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा, अंगणवाडींना भेटी दिल्या. वणी, आर्णी, मारेगाव, नेर, कळंब, घाटंजी, उमरखेड, महागाव, दारव्हा, पांढरकवडा आदी पंचायत समितींना भेटी देऊन एकूण कामकाजाचा आढावा घेतला.

ठळक मुद्देउमरखेडमध्ये महिलांचा घेराव : हिवरासंगमच्या ग्रामसेवकाला शोकॉज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधिमंडळाच्या पंचायतराज समितीने बुधवारी पाच वेगवेगळ्या गटांत जिल्ह्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी आदींना भेटी देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. उमरखेड येथे उमेदच्या महिलांनी समिती सदस्यांना घेराव घातला तर महागाव तालुक्यातील हिवरासंगमच्या ग्रामसेवकाला समितीने शो-कॉज नोटीस बजावली. आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वातील एकूण १५ सदस्यांची पंचायतराज समिती मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाली. या समितीने मंगळवारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सीईओंची साक्ष नोंदविली. त्यानंतर बुधवारी समितीने पाच वेगवेगळे गट करून विविध पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा, अंगणवाडींना भेटी दिल्या. वणी, आर्णी, मारेगाव, नेर, कळंब, घाटंजी, उमरखेड, महागाव, दारव्हा, पांढरकवडा आदी पंचायत समितींना भेटी देऊन एकूण कामकाजाचा आढावा घेतला. उमरखेड येथे समिती सदस्य आमदार कैलास पाटील, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार मेघना बोर्डीकर यांंना घेराव घालून उमेदकडून ना उमेद झालेल्या महिलांनी निवेदन दिले. महागाव तालुक्यात हिवरासंगम येथील ग्रामसेवकाला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे समितीने त्यांना शो-कॉज नोटीस बजावली. महागावच्या पंचायत समिती सभागृहात शिक्षण विभागाची कानउघाडणी केली. विविध बाबींचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कळंब पंचायत समितीत समितीने शिक्षण विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. यवतमाळ लगतच्या लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेलाही समितीने भेट दिली. समितीच्या आगमनामुळे यंत्रणेत धडकी भरली होती. ठिकठिकाणी सदस्यांच्या स्वागतासाठी सरबराई करण्यात आली. बाभूळगाव येथे ११ ग्रामसेवकांकडून झालेल्या अपहार प्रकरणात काय कारवाई करण्यात आली, यावर अधिकाऱ्यांना जाब विचारला. नेरमध्ये गोपनीय चर्चा होऊन समिती निघून गेली. समाज माध्यमात गोपनीय दौरा झाला उघड  समितीच्या पाच पथकांनी मंगळवारी रात्री दौऱ्याचे गोपनीयरीत्या नियोजन केले होते. मात्र रात्रीच हा दौरा फुटला. त्यामुळे कोणते पथक कुठे येणार आहे, याची चाहूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली हेाती. त्यानुसार बुधवारी संबंधितांनी समिती सदस्यांच्या सरबराईत कुचराई होऊ नये म्हणून दक्षता घेतली. सोशल मीडियावर सातत्याने समिती आता येथून निघाली, या मार्गाने गेली, येथे भेट देणार आहे, असे मेसेज दिवसभर फिरत होते. यात शिक्षक सर्वाधिक उत्सुक दिसून आले.

 

टॅग्स :Sanjay Raymulkarसंजय रायमुलकर