शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रतिसाद’ने दिली त्यांच्या आयुष्याला नवी दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

हा उपक्रम राबविण्यापूर्वी संघटनेने पोलीस अधीक्षकांना रितसर अर्ज दिला होता. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात आला. शहरातील १० ते १२ मनोरूग्णांचा शोध या फाउंडेशनने घेतला. स्थानिक तहसील चौकात मनोरूग्णांची कटींग करून त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि चप्पल दिल्या.

ठळक मुद्देमनोरुग्णांना स्नान, कटींग व नवे कपडे : नवरात्रात घेतला नवा वसा, पोलिसात नोंद करून मेडिकलमध्ये उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फाटके कपडे, दाढी वाढलेली त्यावर धुळीचा बसलेला थर, केसांचे पुंजके, मळलेले काळेकुट्ट कपडे, अंगावर घाणीचा थर या अवस्थेत भीक्षा मागणारे मनोरूग्ण आपल्याला दारोदार दिसतात. त्यांच्या हातावर दोन पैसे टाकून आपण मोकळे होतो. मात्र यवतमाळच्या प्रतिसाद फाउंडेशनने नवरात्र उत्सवात नवा वसा घेतला आहे. अशा भिक्षेकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे.हा उपक्रम राबविण्यापूर्वी संघटनेने पोलीस अधीक्षकांना रितसर अर्ज दिला होता. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविण्यात आला. शहरातील १० ते १२ मनोरूग्णांचा शोध या फाउंडेशनने घेतला. स्थानिक तहसील चौकात मनोरूग्णांची कटींग करून त्यांना अंघोळ घालण्यात आली. त्यांना नवीन कपडे आणि चप्पल दिल्या.या मनोरूग्णांची पोलीस ठाण्यात नोंद करून वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता नेले जाणार आहे. यानंतर त्यांना नागपूरच्या मनोरूग्णालयात हलविले जाणार आहे. स्थानिक पातळीवर दुरूस्त होणाºया रूग्णांवर यवतमाळातच उपचार होणार आहे. यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार आहे.या मनोरूग्णांना आणताना फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना प्रचंड कसरत करावी लागली. हे रूग्ण एका जागेवर थांबण्यासाठी तयार नव्हते. त्यांना अनेकांनी पकडून एका जागेवर आणले.प्रतिसादचे अध्यक्ष मनोज गुल्हाणे, उपाध्यक्ष अर्पित शेरेकर, प्रसिद्धी प्रमुख संदीप शिंदे, सचिव सचिन ठाकरे, आरोग्य सेवक राजू मदनकर, कमलेश बघेल, विनोद दोंदल, ऋषिकेश दाभेराव, ऋषिकेश पवार, बाळू खरात, दिनेश अक्कावार, प्रवीण लाहोरे, अतुल तायडे, अनुज गजभिये, ऋषिकेश श्रृतीकार, प्रदीप शिंदे, भगवान भगत, सुरेश खरात ही मंडळी या कामाकरिता मेहनत घेत आहे. प्रतिसाद फाऊंडेशनतर्फे शहर आणि परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य लाभत आहे. प्रतिसादची माहिती घेऊन कुठे अडचण निर्माण झाल्यास त्यांची मदत घेतली जाते.मनोरूग्ण महिलांसाठी स्वतंत्र विंगया मोहिमेत मनोरूग्ण महिलांना सावरण्यासाठी प्रतिसादची स्वतंत्र विंग स्थापन करण्यात आली आहे. या महिला मनोरुग्ण महिलांची सुश्रृषा करण्यासोबत त्यांना रूग्णालयापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे.विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिकया मोहिमेला दिशा देण्यासाठी विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिकांनी पुढाकार घेतला. दैनंदिन कामकाज सांभाळत त्यांनी या उपक्रमाला मोलाचा हातभार लावला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक