शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

शेवटचे दान करताना बुद्धविहाराच्या द्वारात सोडला प्राण

By admin | Updated: October 16, 2016 00:50 IST

कष्टातून मिळविलेली आयुष्यातील पुंजी शेवटच्या क्षणी समाजाला दान करण्याची इच्छा तिने शेजाऱ्यांकडे व्यक्त केली.

अकोलाबाजारच्या ८० वर्षीय अंबूबाई : आयुष्यभर गोळ्या-बिस्किटे विकून जमविलेली पुंजी दिली विहाराला हमीदखाँ पठाण  अकोलाबाजारकष्टातून मिळविलेली आयुष्यातील पुंजी शेवटच्या क्षणी समाजाला दान करण्याची इच्छा तिने शेजाऱ्यांकडे व्यक्त केली. विशेष म्हणजे ही शेवटची इच्छा पूर्ण करतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. गाठीशी बांधून ठेवलेली पुंजी बुद्ध विहाराला दान करीत असतानाच बुद्धविहाराच्या दारातच अंबूबाई बुद्धवासी झाल्या. अकोलाबाजार येथील अंबूबाई हरिभाऊ खरतडे यांचे गुरुवारी ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ८० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी येथील प्राथमिक शाळेच्या गेटसमोर बसून गोळ्या, बिस्किटे विकून उदरनिर्वाह केला. पतीच्या व एकुलत्या एक मुलीच्या निधनानंतर अंबूबार्इंनी सामाजिक कार्यातही नेहमी सहभाग घेतला. तुटपुंजा कमाईतही दानशूर व्यक्ती म्हणून त्या परिचित होत्या. गोळ्या बिस्किटे विकून मिळालेल्या पैशातून समाजकार्याला त्यांनी हातभार लावला. आठ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळी त्यांनी बुद्धविहाराला अंत्यसंस्काराकरिता एक लोखंडी शिडी दान दिली. वय थकल्यामुळे त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूरला जावू शकत नव्हत्या. परंतु नागपूर प्रवासाची रक्कम बुद्धविहाराला दान म्हणून त्या देत होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांना मृत्यूची चाहूल लागली. मृत्यूपर्वी पदरी शिल्लक असलेली रक्कम बुद्धविहाराला दान देण्याची त्यांची इच्छा होती. शेजारी महिलांनी त्यासाठी त्यांना चंद्रमौळी झोपडीतून आॅटोत बसवून बुद्धविहारात नेले. तिथे अंबूबाईने आपल्या फाटक्या लुगड्याच्या पदरात बांधून ठेवलेल्या चंचीतील १२०० रुपये बुद्धविहाराला दान दिले. दान देत असतानाच विहाराच्या दारातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. अंबूबाईच्या निधनाने उपस्थितांना आश्रू आवरता आले नाही. माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह अंत्यसंस्काराला नेताना ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ या मंत्राची वंदना करीत न्यावे व तेथे मृतदेहाला अग्नीच देण्यात यावा, अशी इच्छा अंबूबाईने मृत्यूपर्वी व्यक्त केली होती. त्यानुसारच समाजबांधवांनी शुक्रवारी अंत्यसंस्कार केले.