शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यात गरिबच लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

शहरातील अतिक्रमण ही गंभीर समस्या असल्याने त्यावर यथोचित कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्याच्या तरतुदींचे पालन होणेही महत्त्वाचे आहे. यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढले जात आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याऐवजी जेसीबी लाऊन तिचे नुकसान केले जात आहे.

ठळक मुद्देशहरातील कारवाई : जंगम मालमत्तेची मोडतोड, भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात नगरपरिषदेतर्फे राबविल्या जाणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव केला जात आहे. गरिबांची दुकाने मोडमोड केली जात आहे, तर मोठ्या बाजारपेठांमधील दुकानांच्या वाढलेल्या अतिक्रमणांना संरक्षण दिले जात आहे. अतिक्रमण काढण्याची कारवाई नियमबाह्य आहे. जंगम मालमत्तेची मोडतोड करण्यात येत आहे. नुकसान झालेल्या गरिबांना भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.शहरातील अतिक्रमण ही गंभीर समस्या असल्याने त्यावर यथोचित कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या कायद्याच्या तरतुदींचे पालन होणेही महत्त्वाचे आहे. यवतमाळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शशीमोहन नंदा यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण काढले जात आहे. जंगम मालमत्ता जप्त करण्याऐवजी जेसीबी लाऊन तिचे नुकसान केले जात आहे.कोरोना महामारीमुळे गेली तीन महिन्यांपासून शहरातील उद्योग व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. हातगाडीवरील व्यवसायही पूर्णपणे ठप्प आहे. हातगाड्या रस्त्यालगत बंद असताना त्या जप्त करण्याऐवजी मोडतोड करण्यात आल्या. केवळ गरीब व्यावसायिकांनाच या मोहिमेत लक्ष्य केले जात आहे. मुख्य बाजारपेठेतील व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखविले जात नाही. जुनी मेनलाईन, इंदिरा गांधी मार्केट, दत्त चौक, आर्णी रोड, टांगा चौक, मारवाडी चौक, गोदणी रोड या भागात अनेक व्यापाºयांचे पक्के अतिक्रमण आहे. असे असताना दलित, आदिवासी व बहुजन समाजातील लोकांच्याच अतिक्रमणांना लक्ष्य केले जात आहे. काही लोकप्रतिनिधींनीही अतिक्रमण केले आहे. ते काढण्याचे धाडस मुख्याधिकाºयांनी दाखवावे, असे आव्हान या निवेदनातून करण्यात आले आहे. अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, सैयद सोहराब, प्रशांत ठाकरे, किशोर भोवते, महल्ले, अ‍ॅड. रवींद्र अलोणे, नौशाद काराणी, धनंजय मानकर आदींनी निवेदन दिले.

टॅग्स :Socialसामाजिक