पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

By Admin | Updated: May 28, 2016 02:30 IST2016-05-28T02:30:21+5:302016-05-28T02:30:21+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस साजरा करण्यात आला.

Police personnel took pledge | पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा

यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस कर्मचाऱ्यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली.
गृहमंत्रालयाच्या सूचनेप्रमाणे शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्यासह कार्यालयातील सर्व शाखा व घटकातील अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, पोलीस उपअधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक संजय शिरभाते, कार्यालय अधीक्षक खरतडे यांच्यासह सर्व शाखा प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Police personnel took pledge