शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल, तीन युवकांवर पोलीस तपास केंद्रित

By admin | Updated: September 13, 2014 00:26 IST

माहूरच्या रामगड किल्ल्यातील शाहरुख व निलोफर या युगुलाच्या हत्येमागील रहस्य ४८ तासानंतरही उलगडू शकलेले नाही.

उमरखेड (कुपटी) : माहूरच्या रामगड किल्ल्यातील शाहरुख व निलोफर या युगुलाच्या हत्येमागील रहस्य ४८ तासानंतरही उलगडू शकलेले नाही. दरम्यान पोलिसांनी शाहरुखच्या वाहनात आढळलेला मोबाईल आणि त्यांचा पाठलाग करणाऱ्या अज्ञात तीन युवकांवर आपला तपास केंद्रित केला आहे. पुसद येथील अभियांत्रिकीचे विद्यार्थी शाहरुख खान फिरोज खान पठाण (२३) रा. जाकीरहुसेन वार्ड उमरखेड आणि निलोफर मारिया खालीद बेग मिर्झा (२०) रा. दुधे ले-आऊट गांधीनगर पुसद या दोघांची १० सप्टेंबरला माहूरच्या किल्ल्यात गळा चिरुन हत्या करण्यात आली. या हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. दोनही कुटुंबियांनीसुद्धा पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केली नाही की संशय व्यक्त केलेला नाही. त्यामुळेच घटनेवरून दोन दिवस लोटूनही खुनामागील रहस्य कायम आहे. नेमका खून कुणी आणि कशासाठी केला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पोलीसही अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नसून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. अद्याप पोलिसांच्या तपासाची ठोस दिशा निश्चित झाली नाही. दरम्यान शाहरुखच्या गाडीत त्याचा मोबाईल पोलिसांना आढळून आला. त्याद्वारे काही सुगावा मिळतो का या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. घटनेच्यावेळी शाहरुख व निलोफर या दोघांच्या मागे तीन जण जंगलात गेल्याचे सांगितले जाते. हे तीन जण नेमके कोण, स्थानिक की बाहेरचे, यावर माहूर पोलिसांनी तूर्त लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान या तपासाच्या अनुषंगाने पुसद, उमरखेडसह अन्य भागात पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा फार उपयोग होऊ शकला नाही. पोलीस पथकांनी वारंवार घटनास्थळी भेटी देऊन काही सुगावा लागतो का याचा शोध घेतला. मात्र तेथे तपासाला दिशा देणारे काहीही मिळून न आल्याने मारेकरी शातीर असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. शाहरुख व निलोफरच्या हत्येने पुसदच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्या दोघांचाही मित्र परिवार या घटनेने सुन्न झाला आहे. अभ्यासात हुशार असलेले, कुणालाही मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या शाहरुख व निलोफरच्या अशा जाण्याने त्यांच्या मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजितसिंह दहिया हे या प्रकरणाच्या तपासावर जातीने लक्ष देऊन आहे. (वार्ताहर )