पाटीपुरा येथे तरुणाचा चाकूने निर्घृण खून

By Admin | Updated: November 1, 2016 02:09 IST2016-11-01T02:09:53+5:302016-11-01T02:09:53+5:30

शहरात सर्वत्र दीपोत्सव सुरू असताना पाटीपुरा परिसरात चौघांनी एका तरुणावर सपासप चाकूने वार

At Patipura, a young knife has a bloodless murder | पाटीपुरा येथे तरुणाचा चाकूने निर्घृण खून

पाटीपुरा येथे तरुणाचा चाकूने निर्घृण खून

यवतमाळ : शहरात सर्वत्र दीपोत्सव सुरू असताना पाटीपुरा परिसरात चौघांनी एका तरुणावर सपासप चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१५ वाजता घडली. शहर पोलिसांनी चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील एकाला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे. या घटनेने पाटीपुरा परिसरात खळबळ निर्माण झाली.
प्रणय उर्फ बंटी सुभाष खोब्रागडे (२०) असे मृताचे नाव आहे. प्रणय सोमवारी सकाळी किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी पाटीपुरा पसिरातील सम्यक क्रांती चौकात चौघांनी अडवून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. आरडाओरडा झाल्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी जखमी प्रणयला अ‍ॅटोरिक्षाने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रणयचे वडील सुभाष खोब्रागडे यांनी शहर पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच टोळीविरोधी पथकाने आरोपी तुषार उर्फ पोकर रणजित मेश्राम (१९) याला सजल रेसिडेन्सी परिसरातून जखमी अवस्थेत ताब्यात घेत शहर ठाण्याच्या शोधपथकाच्या सुपूर्द केले. पोलिसांनी जखमी तुषारला शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी सुभाष खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून अंकुश दामोदर रामटेके (३५), रिंकू अजय रामटेके (१९), सुमित उर्फ बाको बयास, तुषार उर्फ पोकर रणजित मेश्राम यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. (कार्यालय प्रतिनिधी)

शनिवारीच दिली होती जिवे मारण्याची धमकी
४प्रणयला शनिवारी दुपारी आरोपींनी घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली होती. अक्षय रामटेकेच्या खुनाचा बदला घेणार म्हणून आरोपी धमकावत होते, अक्षयच्या खुनात प्रणय असल्याच्या संशयाने आरोपींना पछाडले होते. यातूनच हा खून केल्याचे सुभाष खोब्रागडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: At Patipura, a young knife has a bloodless murder