उन्हाचा पारा वाढत असताना गारवा मिळविण्याच्या नादात जर तुम्ही बर्फ गोळा खात असाल तर सावधान...! या बर्फ गोळ्याला चव आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येत आहे. यातून दुर्धर आजाराची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ...
समाजातील दु:खी घटकावर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी दोन ज्येष्ठ व्यक्तींनी यवतमाळच्या तिरंगा चौकात भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रामुख्याने शेतकरी आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावे यासाठी जयकुमार पोकळे व जगन्नाथ शिरसाठ उपोषणाला बसले आहेत. ...
जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले. ...
जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. ...
सामूहिक प्रयत्नातून अशक्य ते शक्य होऊ शकते. अशाच पद्धतीने तालुक्यातील ३० गावातील नागरिकांनी एकजूट करत पाणीटंचाईवर मात करण्याचा दृढ संकल्प केला. या गावात ‘एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया’ अशीच स्थिती निर्माण झाली आहे. ...
शेतकऱ्यांना लुटण्यासाठी शासन कोणतीच संधी सोडत नाही. जीएसटी ही केंद्रीय कर प्रणाली असल्याने एक वेळा दिल्यानंतर पुन्हा लागत नाही. मात्र शेतकऱ्याला पीक कर्ज घेतानाही जीएसटी द्यावी लागते. बाजारातून खते, कीटकनाशक व इतर कृषी साहित्य खरेदी करतानाही जीएसटी म ...
येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता. ...
येथील एमआयडीसी परिसरातील मेमाई स्पिनिंग फॅक्टरीला शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत एक कोटी ७५ हजार रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. मशीनमधून उडालेल्या ठिणगीमधून ही आग लागल्याचे सांगितले जाते. ...
हवामान खात्याने विदर्भात उष्णतेची लाट पसरण्याचा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. गुरूवारी जिल्ह्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नोंद झाली. या नोंदीने एप्रिल महिन्यातील गत १० वर्षामधील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. ...