शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पोक्सो’तील आरोपीला वाचविण्यासाठी पीडितेच्या जन्मतारखेत खाडाखोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील निकालाच्या प्रती योग्य कारवाईसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी, पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पांढरकवडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निकेश नामक २० वर्षीय युवकावर भादंवि ३४१, ३५४, ३५४ (अ), ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

ठळक मुद्देपांढरकवडा सत्र न्यायालयाकडून गंभीर दखल : नगरपरिषद, ग्रामपंचायतीच्या संबंधित दोषींवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश, सीओ, बीडीओ, कलेक्टरला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील (पोक्सो) आरोपीला वाचविण्यासाठी पांढरकवडा नगर परिषद आणि तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू अभिलेख्यात खाडाखोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या निदर्शनास आला. न्यायालयाने त्याची दखल घेऊन यातील आरोपीला मदत करण्यासाठी खाडाखोड करणाऱ्या संबंधितांचा शोध घ्यावा आणि चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश १६ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केले आहेत. न्यायालयाने पोक्सो प्रकरणातील निकालाच्या प्रती योग्य कारवाईसाठी यवतमाळचे जिल्हाधिकारी, पांढरकवडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पांढरकवडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. पांढरकवडा पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून निकेश नामक २० वर्षीय युवकावर भादंवि ३४१, ३५४, ३५४ (अ), ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात आणखी एक आरोपी होता. मात्र खटल्यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पांढरकवडा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांच्या पुढे हा खटला चालला. फिर्यादी युवती अल्पवयीन नव्हती हे दाखविण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी तिच्या जन्मतारखेच्या दाखल्यात खाडाखोड करण्यात आली. संशय आल्याने न्या. नाईकवाड यांनी पांढरकवडा नगर परिषद आणि संबंधित ग्रामपंचायतीचे जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड मागविले. तेव्हा त्यात नावात खाडाखोड आढळून आली. दोषींचा शोध घेण्याचे आदेशपोक्सोतील आरोपीला वाचविण्यासाठी पांढरकवडा नगर परिषदच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील आणि आरोपी रहिवासी असलेल्या संबंधित ग्रामपंचायतीमधील कुणी तरी कर्मचारी मदत करीत असल्याचे रेकॉर्डवरील खाडाखोडीवरून न्यायालयाच्या निदर्शनास आले. रेकॉर्डवर खाडाखोड करणाऱ्या नगर परिषद व संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा शोध घ्या, त्याची चौकशी करा व तातडीने त्याच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. नाईकवाड यांनी नगर परिषद, पंचायत समिती, प्रशासन व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशाने संबंधित यंत्रणेत खळबळ निर्माण झाली आहे.

पीडितेच्या आईला जुळ्या मुली झाल्या, मरण पावल्या, त्याचाही घेतला आधार फिर्यादी तरुणीच्या आईला १९९६ मध्ये जुळ्या मुली झाल्या. मात्र, दोन दिवसांतच त्या दगावल्या. त्यांच्या जन्माची नोंद पांढरकवडा नगर परिषदेमध्ये आहे. मात्र त्याचाच आधार घेऊन फिर्यादी तरुणीचा तेथे जन्म दाखविला. तिचे वय तेथे जास्त दाखविण्याचा प्रयत्न केला.  संशय निर्माण झाल्याने यातील आरोपीला सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले गेले.  

 

टॅग्स :Courtन्यायालय