शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एसटी महामंडळात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे.

ठळक मुद्देपरिपत्रक अंमलबजावणी : मर्जीतील कर्मचाऱ्यांवर मेहेरबानी, विभाग नियंत्रकांचे हवे नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांकडून दुजाभाव होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट लोकांसाठी परिपत्रकाचा वापर कठोरतेने होत आहे, तर मर्जीतील लोकांवर मेहेरबानी दाखविली जात असल्याची ओरड आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रकार नियंत्रणात आणावा, अशी अपेक्षा अन्यायग्रस्त कर्मचाºयांकडून होत आहे.गेली काही दिवसांपासून महामंडळाच्या यवतमाळ विभागाचा कारभार बेताल सुरू आहे. कुणाचा पायपोस कुणाला नाही. या सर्व प्रकारात महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे. विभागीय कार्यालयातील अनेक शाखांमधील कामकाज अक्षरश: ढकलले जात आहे. हिशेबात चुका करून काही लोकांना जादा रक्कम दिल्याचे प्रकार घडत आहे. यावर कारवाई होत नसल्याने कर्मचाऱ्यांमधील दिरंगाईचा प्रकार झपाट्याने वाढत आहे.महामंडळाचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. यासाठी परिपत्रक काढून विभागांना सूचना केल्या जात आहे. आगार पातळीवरून याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना काही ठिकाणी दुजाभाव होत असल्याची ओरड कामगारांमधून सुरू आहे. चालक व वाहकाने एकाच मार्गावर जावू नये, असे परिपत्रक अलीकडेच काढण्यात आले आहे. या परिपत्रकाचे अधिकाऱ्यांनी स्वागत करताना एकाच मार्गावर जाणाऱ्या काही लोकांचा रूट बदलविला. मात्र दुसरीकडे विशिष्ट लोकांना यातून सूट देण्यात आली. यवतमाळ-नांदेड, यवतमाळ-औरंगाबाद यासह काही ठिकाणच्या रात्रमुक्कामी बसेसवर तेच ते कर्मचारी ड्यूटीवर जात आहे.या बाबी विभागीय कार्यालयाच्या निदर्शनास कशा येत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विभागीय कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांकडूनही कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाई केली जाते. पांढरकवडा प्रशिक्षण केंद्रातील प्रकाराने ही बाब स्पष्ट झाली आहे. आर्थिक देवाणघेवाण प्रकरणात लिपिकाला निलंबित करण्यात आले. एका अधिकाऱ्याचे नाव स्पष्टपणे घेतले जात असतानाही कारवाई करण्यात आलेली नाही. लहान कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्याचे धोरण यवतमाळ विभागातील अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे.यवतमाळात ‘बसफेऱ्या रद्द’चा आजारयवतमाळ आगारातील अनेक बसफेऱ्या रद्द केल्या जात आहे. तिकीट मशीनचा तुटवडा, बसेसची अपुरी संख्या, चालक-वाहक उपलब्ध नसणे आदी कारणे या मागे सांगितली जातात. वास्तविक ही सर्व परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. आगारात अनेक बसेस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असतात. त्या दुरुस्त करून घेण्यात संबंधित अधिकाऱ्यांची इच्छाशक्तीच नसल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :state transportएसटी