कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:43+5:30

जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. गतवर्षी ही लागवड अडीच हजार हेक्टरपर्यंत झाली. मध्यंतरी आलेला पाऊस, गारपीट यातून उत्पादनात घट झाली. कांद्याचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कांदा सडला.

Onion growers in trouble | कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

ठळक मुद्देदर घसरले : गारपिटीने उत्पादनातही घट, माल जागीच सडला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चांगले दर मिळतील या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र कांदा बाजारात येताच दर घसरले आहे. यातून शेतकरी अडचणीत आले आहे.
जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. गतवर्षी ही लागवड अडीच हजार हेक्टरपर्यंत झाली. मध्यंतरी आलेला पाऊस, गारपीट यातून उत्पादनात घट झाली. कांद्याचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कांदा सडला. लॉकडाऊन स्थितीत कांद्याचे दर पडले आहेत. काही दिवसांपूर्वी २० ते २५ रूपये किलो असलेला कांदा आता १० ते १५ रूपये किलो झाला आहे. ठोक बाजारात १२०० रूपये दर आहे. बाजारात घेवालही नाही.

व्यापारी घेतात अडचणीचा फायदा
व्यापारी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात कांदा घेतात आणि साठा करून चढ्या दरात विक्री करतात. शेतकऱ्यांडे साठवणुकीची उपाययोजना नाही. याचा फायदा व्यापारी घेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचे पैसे मिळतच नाही.

Web Title: Onion growers in trouble

टॅग्स :onionकांदा