शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार ३७७ जणांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : नागरिकांनी आता खरा लॉकडाऊन पाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून आजपर्यंत एक हजार ३७७ नागरिक, मजूर, विद्यार्थी आले आहेत. त्यांची प्रथमत: केळापूर येथील जगदंबा मंदिरात वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. तेथे आरोग्य विभाग, महसूल व पोलीस विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी शासनाने मुभा दिली आहे. त्यामुळे नागरिकांचा लोंढा आता गावाकडे येत असून दररोज १०० ते १५० नागरिक गावात येत आहेत. प्रत्येक गावात कोरोना प्रतिबंधक दक्षता कमिटीमार्फत स्थलांतरीत मजुरांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांना जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात येत आहे, तर शहरी भागात त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन केले जात आहे. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे येथून ९८, तर मुंबईतून ५८ नागरिक आले आहेत. आजपर्यंत केळापूर तालुक्यात एकही कोरोना रूग्ण आढळून आला नाही, ही प्रशासनाची जमेची बाजू आहे. मात्र प्रशासनासोबतच नागरिकांची जबाबदारेखील वाढली आहे.आता मात्र स्थलांतरीत नागरिकांना किमान १४ दिवस क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे. तसेच कोणाला कोरोनाविषयक लक्षणे आढळून आले, तर तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार यांना कळवावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. अन्यथा एखादी छोटीशी चूकदेखिल अनेकांचे जीव धोक्यात टाकू शकते. त्यामुळे नागरिकांना ३१ मेपर्यंत अतिशय जागरूक व सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या