शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

बंदच्या वाटेवरील शाळा झाली आयएसओ

By admin | Updated: October 19, 2016 00:17 IST

शिक्षक मनापासून झटले तर शाळेचा कायापालट कठीण नसतो. यवतमाळ नगरपरिषदेच्या दोन शाळा काही वर्षांपूर्वी पटसंख्येविना बंद पडल्या.

नगरपरिषदेची पहिली शाळा : यवतमाळातील डिजिटल ग्रीन पार्क स्कूलची भरारी, पटसंख्याही झाली दुप्पट, मोफत अभ्यासवर्गअविनाश साबापुरे यवतमाळशिक्षक मनापासून झटले तर शाळेचा कायापालट कठीण नसतो. यवतमाळ नगरपरिषदेच्या दोन शाळा काही वर्षांपूर्वी पटसंख्येविना बंद पडल्या. गेडामनगरातील तिसरी शाळाही मरणासन्न अवस्थेतच होती. पण येथील शिक्षकांनी गेल्या चार वर्षात घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे ही शाळा नुसती तगलीच नाही, तर आज जिल्ह्यातील पहिली नगरपरिषद आयएसओ मानांकित शाळा बनली आहे. डिजिटल ग्रीन पार्क स्कूल म्हणून या शाळेचे नाव आदराने घेतले जाते.संजय गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्र. १८ काही वर्षांपूर्वी शहरातील विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ होती. पण कालांतराने नगरपरिषदेच्या शाळांची प्रतिमा मलीन होत गेली आणि गेडामनगरातील या शाळेलाही ओहोटी लागली. पटसंख्या झपाट्याने घटली. यवतमाळ नगरपरिषद इतर दोन शाळांप्रमाणेच ही शाळाही बंद करण्याच्या मानसिकतेत होती. पण येथील तंत्रस्नेही शिक्षक संजय चुनारकर यांनी नवनव्या उपक्रमांतून शाळेला नवसंजीवनी दिली. गेल्यावर्षी ३० असेलेली पटसंख्या यंदा ६० म्हणजे दुप्पट झाली. मुख्याध्यापिका ज्योती सावळकर आणि उपक्रमशील शिक्षिका मुक्ता लाड यांनीही धडाडीने काम सुरू केले. येथील शिक्षकवर्ग शहरातील दानशूर लोकांपर्यंत पोहोचला आणि शाळेसाठी लोकवर्गणीच्या कामाला वेग आला. आधी शिक्षकांनी स्वत: १० हजारांची वर्गणी केली. मग संस्कार एकता कलश ग्रपच्या महिलांनीही ८० हजार रुपयांची मदत केली. नगरपरिषद प्रशासनाकडून २० हजार मिळाले. शिक्षक संजय चुनारकर यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी आणि मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून शाळेसाठी शाळेसाठी स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक, स्कॅनर असे साहित्य मिळविले. शाळा डिजिटल झाली. ज्ञानरचनावादी अध्यापनासाठी प्रत्येक वर्गखोलीची खास रंगरंगोटी आणि रचना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी भाषेतून ज्ञानरचनावाद या शाळेने अवलंबला आहे. शाळेच्या चारही बाजूंनी रस्ता आहे. सुसज्ज कंपाउंडच्या आत मोठ्या इमारतीच्या भोवती विस्तीर्ण मोकळे मैदान आहे. याच मैदानात वृक्षारोपणातून ग्रीनझोन करण्यात आला आहे. एका बाजूला वनौषधी प्रकल्प साकारण्यात आला. गांडूळखत प्रकल्पावर काम सुरू आहे. याच मैदानाचा काही भाग आता शेतीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला आधुनिक पद्धतीचा अ‍ॅथलेटिक्सकरिता ट्रॅक करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. विशेष म्हणजे, या शाळेत सायंकाळी ६ ते ७ पर्यंत अभ्यासवर्ग घेतला जातो. शाळेचे विद्यार्थी तर या वर्गात येतातच, पण परिसरातील इतर शाळांचे विद्यार्थीही येतात. ज्यांना घरी अभ्यास करणे शक्य नाही, त्यांना या वर्गाचा फायदा मिळतो. त्यातून नगरपरिषद शाळेविषयी शहरातील पालकांची मानसिकता बदलण्यास मदत होत असल्याचे शिक्षक संजय चुनारकर म्हणाले. मोफत अभ्यासवर्गासोबतच हस्ताक्षर सुधार प्रकल्प, प्रत्येक शनिवारी होणारी बालसभा ही या शाळेची बलस्थाने ठरली. लोकांकडून मिळालेल्या १० हजार पुस्तकांचे शाळेत बालवाचनालय येथे आहे. यावर्षी विद्यार्थ्यांना टॅब पुरवून दफ्तर हलके करण्याचा प्रयत्नही सुरू आहे.