शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात कोरोना विषाणू बळींची संख्या पोहोचली १५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

ठळक मुद्दे८८ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह । शनिवारी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ४५० बाधित

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ जणांचे बळी गेले आहे. शनिवारी नव्याने नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.गेल्या महिनाभरापासून शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. १३ ऑगस्टला १७, १४ ऑगस्टला सहा, १५ ऑगस्टला २१, १६ ऑगस्टला १७, १७ ऑगस्टला दोन, १८ ऑगस्टला सहा, १९ ऑगस्टला दोन, २० ऑगस्टला पाच तर २१ ऑगस्टला पाच अशा ८१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी आणखी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ८८ वर पोहोचली आहे.शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका जिल्हा परिषद शिक्षकाचा समावेश आहे. याशिवाय शुक्रवारी एका ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण बळीसंख्या १५ वर पोहोचली आहे. शनिवारी पॉथझटिव्ह आलेल्या नऊ जणांमध्ये एका शिक्षकासह लोहार लाईनमधील सहा, द्वारकानगरीतील दोन आणि पार्वतीनगरमधील एकाचा समावेश आहे. तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या एकूण आता ४५० वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत ३४७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. नव्याने ३५ जणांचे स्वॅब यवतमाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली.शहर व तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट बनला आहे. सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढत आहे. संपूर्ण यंत्रणा रुग्णांवरील उपचार आणि संशयित रुग्णांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र नागरिकांकडून अद्यापही पुरेशाप्रमाणात सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांच्या मार्गदर्शनात यंत्रणा कार्यरत आहे. आता नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.गर्दीमुळे संसर्गाचा धोका कायमप्रशासनातर्फे एसडीओ डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ, टीएचओ डॉ.आशीष पवार, बीडीओ शिवाजी गवई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरिभाऊ फुपाटे, मुख्याधिकारी डॉ.किरण सुंकलवाड आदी नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र अनेक नागरिक विनाकारण विनामास्क घराबाहेर पडत आहे. गणेशचतुर्थीला बाजारात गर्दी दिसून आली.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या