शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दारव्ह्याचे वाटोळे केले, आता यवतमाळचे करणार

By admin | Updated: October 8, 2014 23:32 IST

आपल्या आमदारकी, मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणिकराव ठाकरे यांनी आधी दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचा बँड वाजविला आणि आता ते यवतमाळ मतदारसंघ

विधानसभा : संदीप बाजोरिया यांची माणिकराव ठाकरेंवर टीकायवतमाळ : आपल्या आमदारकी, मंत्रीपद आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात माणिकराव ठाकरे यांनी आधी दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचा बँड वाजविला आणि आता ते यवतमाळ मतदारसंघ बुडवायला निघाले आहेत, अशी परखड टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांनी केली आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आमदार संदीप बाजोरिया यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले. त्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन व विकासाद्वारे तेवढीच साथ दिली. त्यामुळे राज्यातील जनता राष्ट्रवादीच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार विजयी होतील. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जागांवर बाजोरिया यांनी विजयाचा दावा केला आहे. बाजोरिया म्हणाले, यवतमाळच्या आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांची उमेदवारी डावलून माणिकराव ठाकरे यांनी मुलगा राहुलसाठी दिल्लीत धमकी देत काँग्रेसचे तिकीट आणले. दिग्रस-दारव्हा हा माणिकरावांचा गृह मतदारसंघ ओळखला जातो. याच मतदारसंघाने माणिकरावांना आमदारकी, मंत्रीपद, प्रदेशाध्यक्षपद बहाल केले आहे. त्यांनी आपला आमदारकीचा बहुतांश विकास निधी याच मतदारसंघात खर्ची घातला. मात्र गेल्या दहा वर्षात तेथे शिवसेनेचे नेटवर्क स्ट्राँग झाल्याचे पाहून माणिकरावांनी जणू या मतदारसंघाशी फारकत घेतली आहे. दिग्रस-दारव्हामध्ये आपली डाळ शिजणार नाही, याचा अंदाज घेऊन माणिकरावांनी लोकसभेपासूनच यवतमाळवर वक्रदृष्टी फिरविली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्या प्रचाराचा देखावा निर्माण करून मुळात माणिकरावांनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची बांधणी चालविली होती. मतदार याद्या आणि संपर्क क्रमांकाची यादी मिळविण्यासाठीसुद्धा तेव्हापासूनच प्रयत्न सुरू होते.