शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘सीओ’च्या उपस्थितीत साफसफाई

By admin | Updated: May 28, 2015 01:57 IST

राज्यासह केंद्रशासनही मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवित आहे.

नगरपरिषद क्षेत्र : जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना, उपस्थितीसाठी बायोमेट्रिक यंत्र लावणारयवतमाळ : राज्यासह केंद्रशासनही मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवित आहे. या मोहिमेला अधिक गती देण्यासोबतच नगरपरिषदक्षेत्र स्वच्छतेच्या बाबतीत परीपूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये रोज सकाळी ६ ते ८ सफाई मोहीम मुख्याधिकाऱ्यांनी उपस्थित राहून राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.महसूल भवनात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी तथा नगर पालिका प्रशासनचे जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र फुलझेले तसेच सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. सकाळी स्वच्छता मोहीम मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित राहून राबवावी. सकाळी सफाई कर्मचाऱ्यांसह नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एका ठिकाणी जमा व्हावे. नंतर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. स्वच्छता मोहीम राबवित असताना रोज फोटो काढुन ते निदर्शनास आणावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.घनकचरा व्यवस्थापनाबाबत सूचना करताना नगरपरिषदेची लोकसंख्या, प्रॉपर्टी संख्या याबाबत पूर्वी झालेले सर्वेक्षण व कालावधी, डंपिंग ग्राऊंड, घनकचऱ्यावरील प्रक्रिया याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. नगरपरिषद क्षेत्रातील प्राधान्यक्रमाने दुरुस्त करावयाचा कच्चे व पक्के रस्ते रस्त्यांचा खर्चासह आराखडा तयार करून सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. विविध कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात यावी, कामे घेताना प्राधान्यक्रमानुसार विचार करावा. सुचीप्रमाणे कामे नसल्यास प्रशासकीय मान्यता दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.मुख्याधिकाऱ्यांनी रस्ते हस्तांतरण करण्याची कार्यवाही नियमाप्रमाणे करावी. नगरोत्थान योजनेतून गेल्या पाच वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामाची यादी, मालमत्तेचे पूर्वीचे कर आणि वाढीव कर याबाबत तातडीने माहिती सादर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. सुरळीत पाणी पुरवठ्याच्यादृष्टीने पुरवठ्याची मेनलाईन, वितरण लाईन तसेच काही भागात पाणी मिळत नसल्यास अशा ठिकाणांचा उल्लेख असलेला नकाशा तयार करून तो सादर करावा. स्वच्छतेच्यादृष्टीने घंटागाडी, ट्रॅक्टर, डंपर ही वाहने नियमित कार्यरत असावी. वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. (कार्यालय प्रतिनधी)दांडीबहादर कर्मचाऱ्यांना घालणार आवरनगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष टिप्स मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बेशिस्त कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, हे स्पष्ट बजावून सांगण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी प्रत्येक नगरपरिषदेमध्ये बायोमेट्रिक यंत्र लावून त्याद्वारे हजेरी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. नगरपरिषद क्षेत्रात असलेल्या मागील दहा वर्षापूर्वीच्या खुल्या जागेची माहिती सादर करण्यासोबतच शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दहाही नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. या सर्व सूचनांचा कार्यपालन अहवाल सादर करावा लागणार आहे.