शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीसाठी १६ बीडीओंना नोटीस

By admin | Updated: March 13, 2015 02:19 IST

गृह आणि पाणी कराच्या वसुलीत जिल्ह्यातील १६ ही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती माघारल्या आहेत.

यवतमाळ : गृह आणि पाणी कराच्या वसुलीत जिल्ह्यातील १६ ही पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायती माघारल्या आहेत. या कराची वसुली करण्यासाठी ३१ मार्चचा अल्टीमेटम देण्यात आला असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने १६ ही गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर कारवाईचे संकेतही दिले आहे. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा मूळ स्रोत म्हणजे गृह आणि पाणीकर होय. परंतु या कर वसुलीत जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती माघारल्याचे दिसत आहे. कर वसुली वाढविण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. वसुलीचा पाठपुरावा करण्यासाठी ग्रामसेवकांकडून आढावा घेण्याची जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर देण्यात आली. मात्र अनेक ग्रामपंचायतीकडे कराची थकबाकी आहे. वसुली करण्यासाठी जिल्ह्यात यावली शहीद पॅटर्न राबविला जाणार आहे. यामध्ये उद्दीष्टापैकी प्रत्येक महिन्याला किती टक्के वसुली हवी याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार दर महिन्याला वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. जून ते फेब्रुवारीपर्यंत कर वसुली करावयाची आहे. त्याचे ठराविक टप्पे सूचविण्यात आले आहे. यामुळे वसुली करणे सुलभ होणार आहे. या पॅटर्नबाबत गटविकास अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. मार्चपूर्वी १०० टक्के वसुली करण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी अद्याप पंचायत विभागाला कुठलेही उत्तर सादर केले नाही. वसुलीचे ठराविक उद्दीष्ट ग्रामपंचायतींना पूर्ण करता आले नाही. जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ ४६ टक्केच वसुली झाली आहे. (शहर वार्ताहर)