शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या हजारो लेकींसाठी नाही एकही ‘सावित्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

आदिवासी, दुर्गम असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दळणवळणासह विविध भौतिक सुविधांचा अभाव असतानाही दोन लाख ४३ हजार ९६४ ग्रामीण मुली शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आई-वडील रोजमजुरीला गेले तरी या मुली शिक्षणासाठी पायपीट करीत शाळेपर्यंत पोहोचतात. मात्र जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही.

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आई-वडिलांना सोडून दिवसभर शाळेत राहणाऱ्या मुलींना विविध प्रकाराच्या शारीरिक, मानसिक, भावनिक समस्या भेडसावतात. मात्र त्या शेअर करण्यासाठी त्यांच्या शाळेत एकही महिला शिक्षिका नाही. त्यामुळे गुणवत्तेत तरबेज असलेल्या मुली मानसिक कुचंबणेपायी अभ्यासात मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. एक-दोन नव्हे तर जिल्ह्यातील ११४१ शाळांमध्ये शिक्षिका नसल्याचे गंभीर वास्तव आहे. आदिवासी, दुर्गम असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात दळणवळणासह विविध भौतिक सुविधांचा अभाव असतानाही दोन लाख ४३ हजार ९६४ ग्रामीण मुली शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आई-वडील रोजमजुरीला गेले तरी या मुली शिक्षणासाठी पायपीट करीत शाळेपर्यंत पोहोचतात. मात्र जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. गंभीर म्हणजे प्रामुख्याने खेड्यापाड्यातच असलेल्या १५५ अनुदानित शाळा आणि शहरी क्षेत्रात असलेल्या २७ विनाअनुदानित शाळांनाही महिला शिक्षिकांची नेमणूक गरजेची वाटलेली नाही. त्यामुळे मासिक पाळी, शारीरिक दुखणी आणि छेडखानीसंदर्भात मोकळेपणाने कुणाशी बोलावे ही समस्या विद्यार्थिनींना भेडसावत आहे. चालू वर्गात साधी लघुशंकेकरिता सुटी कशी मागावी हाही प्रश्न मुलींपुढे निर्माण होतो. अनेक मुली अशा काळात शाळेत जाणेच टाळतात. विशेष म्हणजे महाराष्ट्र  शासनाने १९९५ च्या सुमारास गाव तिथे शाळा हे धोरण आखतानाच शाळा तिथे एकतरी शिक्षिका हेही धोरण आखले होते. प्रत्यक्षात जिल्ह्यात हे धोरण मातीमोल झाले आहे.  

 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेTeacherशिक्षक