शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नॉनस्टॉप पाऊस

By admin | Updated: September 9, 2014 00:39 IST

जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पाऊस नॉनस्टॉप बरसत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील रेणापूरला सोमवारी पहाटे पुराचा तडाखा बसला असून १८ घरांची पडझड झाली आहे.

रेणापूरला पुराचा फटका : १८ घरांची पडझड यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पाऊस नॉनस्टॉप बरसत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील रेणापूरला सोमवारी पहाटे पुराचा तडाखा बसला असून १८ घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद झरी तालुक्यात झाली असून २४ तासात २०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या ७५.५६ टक्के पाऊस कोसळला आहे.यवतमाळ जिल्ह्यात गत काही दिवसांपासून दररोज पाऊस बरसत आहे. रविवार पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्र नॉनस्टॉप पाऊस बरसत आहे. गत ४८ तासात पावसाने क्षणाचेही उसंत घेतली नाही. यामुळे जनजीवन प्रभावित झाले असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत २४ तासात ६६.१२ मिमी पाऊस कोसळल्याची नोंद आहे. त्यात यवतमाळ २७ मिमी, बाभूळगाव ४० मिमी, कळंब १९ मिमी, आर्णी ६२ मिमी, दारव्हा ३३ मिमी, दिग्रस ३७ मिमी, नेर ४८ मिमी, पुसद ५३ मिमी, उमरखेड १०७ मिमी, महागाव ९५ मिमी, केळापूर ७० मिमी, घाटंजी ४३ मिमी, राळेगाव ४६ मिमी, वणी ९२ मिमी, मारेगाव ७८ मिमी आणि झरी तालुक्यात २०८ मिमी पाऊस कोसळला.बाभूळगाव तालुक्यातील रेणापूर या गावाला सोमवरी पहाटे पुराचा तडाखा बसला. ४ वाजताच्या सुमारास गावात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला. १८ घरांची पडझड होऊन हानी झाली. रेणापूर हे गाव यवतमाळ-अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असून नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हायवे तयार झाल्याने गाव खोलगट भागात गेले. त्यामुळे दोन किमीवरून येणारे पाणी गावालगतच्या नाल्यात शिरुन पूर आला. नाला अरुंद असल्याने पुराचे पाणी घरात शिरले. बाभूळगाव येथील ‘लोकमत’ प्रतिनिधी या गावाला भेट दिली असता अनेक घरातील साहित्य पुरामुळे वाहून गेल्याचे दिसून आले. धान्य, कपडे, भांडी, शेती साहित्याचे मोठे नुकसान झाले. पूरबाधित कुटुंबांना मात्र अन्यत्र हलविण्यात आले नव्हते. (लोकमत चमू)